एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला

Ajit Pawar vs Uddhav Thackeray : अजित पवार यांनी शरद पवार गटानंतर शिवसेना ठाकरे गटाचा बडा नेता गळाला लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मोठे इनकमिंग झाल्याचे दिसून आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महायुतीला एकामागे एक धक्के दिले होते. मात्र विधानसभेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी सोनेरी काळ सुरु झाल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीगोंद्यातील माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. या पाठोपाठ आता अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena UBT) बडा नेता गळाला लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची आज भेट घेतली आहे. अपूर्व हिरे हे या पूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटातच होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे यांच्या विरोधात अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वय हिरे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. 

अपूर्व हिरे घरवापसी करणार? 

अद्वय हिरे यांच्या प्रचार करण्यासाठी अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा पराभव केला. यानंतर आता अपूर्व हिरे यांनी मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अपूर्व हिरे राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता अपूर्व हिरे नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

अजित पवारांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि विधानसभेला पराभूत झालेले राहुल जगताप यांच्या पाठोपाठ आता मानसिंग नाईक देखील अजित पवारांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. अजित पवारांनी निकालाच्या दिवसांपासून शरद पवार गटातील पराभूत आणि निवडून आलेल्या उमेदवाराना फोन करण्यास सुरुवात केली होती. अजित पवारांनी फोन केलेल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवारांशी भेटून चर्चा केली आहे. यापैकी राहुल जगताप लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.  

आणखी वाचा 

ताप काय आला, दरे गावात काय गेले.., शेवटी BJP सांगेल तेच करायचंय, मनसेचा एकनाथ शिंदेंना टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Embed widget