एक्स्प्लोर

Maharashtra Politics : वडगाव शेरीत महायुतीत नाराजीचा सूर? आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसंचा फोटोच नाही, माजी आमदार म्हणतो...

भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ट्वीट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

Maharashtra Politics : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Election 2024) बिगुल अद्याप वाजलं नसलं तरीदेखील सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केली आहे. राज्यात यंदाच्या विधानसभेत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अशी चुरस रंगणार यात काही शंकाच नाही. पण तत्पूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात (Vadgaon Sheri Assembly Constituency) महायुतीत नाराजीचा सूर उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे (BJP) वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी ट्वीट केलं आहे. याच ट्वीटवरुन महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचं बोललं जात आहे. 

भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ट्वीट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. तीनशे कोटींच्या विकास कामांच  भूमिपूजन मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत असतानाच त्याच्या आदल्या दिवशी जगदीश मुळीक यांनी ट्वीट करत तीनशे कोटींची विकास कामे केवळ टिंगरे यांच्या प्रयत्नातून झाली नसून महायुतीतील इतर घटक पक्षांचा देखील त्यात हातभार असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच, टिंगरे यांना महायुतीचा विसर पडला असून महायुती म्हणत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावणे टिंगरे कसे काय विसरले? असा सवाल देखील टिंगरे यांनी केला आहे. 

जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय? 

भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे! वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत! तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही." 

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरुन महायुतीत पेच? 

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीत कोणती जागा कोणाला मिळणार यासंदर्भात मोठा पेच वाढला आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आत्ता सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघावर स्वाभाविकपणे राष्ट्रवादीच्याच पारड्यात पडणार अशा चर्चा सुरू आहेत. नुकतंच वडगावशेरीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा झाली. या दरम्यान अजित पवारांनी सुनील टिंगरे यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करत पुन्हा सुनील टिंगरेचं उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विरुद्ध भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात लढत झाली होती. त्यात जगदीश मुळीक यांचा पराभव झाला होता. तर राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंनी बाजी मारली होती.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या पैशातून व्यवसाय, 10 दिवसात 10 हजार कमावले100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 सप्टेंबर 2024ABP Majha Headlines : 03.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Embed widget