एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : गडकरींसारख्या निष्ठावंत नेत्याला भाजपनं डावललं, आरोप केले त्यांनाच उमेदवारी दिली; उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ

Uddhav Thackeray Attack on BJP : ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच उमेदवारी दिली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कृपाशंकर सिंह यांच्या उमेदवारीवरुन भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.

Uddhav Thackeray PCभाजपने पहिल्या यादीत कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने (BJP) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावललं आणि आरोप केले त्याच कृपाशंकर सिंहांना (Kripashankar Singh) उमेदवारी दिली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत फक्त घोषणा पोहोचतात प्रत्यक्षात मात्र काही नाही. तिथूनच या यात्रेची तुम्ही सर्वांनी सुरुवात केली. या सर्वांचे शिखर खोट्यावर आधारित आहे. जनतेपर्यंत आपण हे सगळं पोहोचवू यासाठी आपण एक शिबिर घेऊ. 

गडकरींसारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजपनं डावललं

गडकरींसारखा निष्ठावंत कार्यकर्ता भाजपामध्ये दशकानुदशके आहे, पण त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. मात्र ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, असं म्हणत उद्धवे ठाकरेंनी भाजपावर हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांचा फोटो लावून अनेक योजना आहेत. मात्र त्या प्रत्यक्षात कुठेही पोहोचत नाही. मी सगळ्यांशी बोलतोय त्यामध्ये वरपासून खालपर्यंत सगळे नाराज आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

'जनतेच्या मनाविरुद्ध तोडाफोडाचे राजकारण'

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत सांगितलं की, 'डोळे असून काही अंधभक्त आहेत ते सोडून द्या. सर्वांमध्ये असंतोष आहे. ईव्हीएमने हे जिंकू शकतात. ईव्हीएममुळे हे जिंकत आहेतच, मात्र आता हे जिंकणार नाहीत, असा गैरसमज पसरवत आहेत. जनता हा लोकशाहीला सर्वात मोठा घटक आहे. जनतेच्या मनाविरुद्ध तोडाफोडाचे राजकारण भाजप करत आहेत. जनतेचा असंतोष असताना देखील ईव्हीएमच्या मदतीने हे जिंकले तर वाईट आहे.' 

भाजप लोकसभा उमेदवार यादीवरून टीकास्त्र

 भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, '195 लोकांची यादी जाहीर केली. नितीन गडकरी यांचं मी सुरुवातीपासून नाव ऐकतोय, ज्या वेळेला मोदी, शाह यांची नावे ऐकली नव्हती. अशा माणसाचं नाव या यादीत नाही आहे. ज्या कृपाशंकर सिंहांवर यांनी आरोप केले त्यांचे या पहिल्या यादीत नाव आहे. शहरात जुन्या योजनांची नावे देखील बदलली. जुमलाचं नाव आता गॅरंटी झालेलं आहे.'

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजना अशी तुमच्या झोपड्यांची पुन्हा जाहिरात व्हायची. लोकांच्या सहनशीलतेचा अंत होण्याआधी तुम्ही सर्वत्र जाऊन त्यांना धीर दिलात, त्याबद्दल सर्व संवाद यात्रेकरूंचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. आता तुम्ही सर्वांनी पायी प्रवास केलात हाच प्रवास आपल्याला दिल्लीच्या दिशेने करायचा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मातृत्व ते शिवतीर्थ हा मुक्त संवाद यात्रा

मातृत्व ते शिवतीर्थ हा मुक्ता संवाद यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि काही पदाधिकारी यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं की, मातृत्व ते शिवतीर्थ हा मुक्त संवाद 20 जानेवारीपासून राज्यभर सुरू झाला. यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांविषयी आम्ही जाणून घेतल. एकूण 13 लोकसभेमध्ये आणि 34 विधानसभेत आम्ही फिरलो. आम्ही या अभियानात बुलढाणा आणि लोणार भागामध्ये फिरलो. जर समृद्धी महामार्ग 38 किलोमीटर त्या भागामधून गेला असता तर त्यांना रोजगार मिळाला असता, अशी त्या लोकांची भावना आहे. आम्हाला कर्जमाफी मिळत नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. लोकांपर्यंत कोणत्याच योजना पोहोचत नाही, ना शासन आपल्या दारी ना काही, असं म्हणत सुषमा अंधारेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 डिसेंबर 2024 : 8 PMBJP vs Congress on George Soros : सोरॉस यांच्यासोबत लागेबांधे असल्याचा भाजपचा काँग्रेसवर आरोपABP Majha Headlines : 09 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 10 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
Embed widget