एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? दिल्लीतील गाठीभेटीनंतर चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असा चर्चांना उधाण आले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या आहेत. आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का? या चर्चांना उधाण आले आहे. 

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची देखील घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल. मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेन तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटीनंतर तेच महाविकास आघाडीचा चेहरा असणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्रिपदासाठी याचना, भाजपचा टोला

दरम्यान, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असणार का? अशी चर्चा रंगलेली असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे पहिले आम्हाला चिडवायचे की, तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात. आज त्यांच्यावर देखील हीच परिस्थिती आली आहे. तीन दिवस दिल्लीत जावे लागले आहे. अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्रिपदासाठी याचना करावी लागते. तरी इतर दोन मित्र हे सांगायला तयार नाही की तेच मुख्यमंत्री असतील. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

आणखी वाचा

Uddhav Thackeray : जनतेचं न्यायालय सर्वोच्च, बांगलादेशमध्ये तेच आज होतंय, तो इशारा सर्वासाठी; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Embed widget