उद्धव ठाकरेंना धक्के सुरुच, मराठवाड्यातील बड्या नेत्याने साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Uddhav Thackeray Shivsena : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसलाय. विधानसभेचं तिकीट देऊनही बड्या नेत्याने साथ सोडली.
Uddhav Thackeray Shivsena, जालना : जालन्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलयं. उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. आसाराम बोराडे यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसलाय. आसाराम बोराडे यांनी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह बोराडे यांचां शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
विधानसभेचे उमेदवारी दिली, तरिही आसाराम बोराडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम
आसाराम बोराडे हे विधानसभा निवडणुकीमध्ये परतूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते...आसाराम बोराडे जालना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देखील होते. या विधानसभा निवडणुकीत थोड्याच मतांनी आसाराम बोराडे यांचा पराभव झाला होता...एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना मनपाचे काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
कोकणातही ठाकरेंचे शिवसैनिक शिंदेंच्या गळाला लागण्याची शक्यता
रत्नागिरीमध्येही काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला होता. माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. वैयक्तिक कारणामुळे पदाचा आणि सदसत्त्वाचा राजीनामा दिल्याचे सचिन कदम म्हणाले होते. त्यानंतर आज मराठवाड्यातही शिवसेनेला बड्या नेत्यानं रामराम ठोकलाय. भास्कर जाधव आणि सचिन कदम यांच्यात उघड संघर्ष होता, त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याचे बोलले गेले. दरम्यान, अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही.
सचिन कदम यांच्या अचानक राजीनामामुळे रत्नागिरीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ पाहायला मिळत आहे. चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये सक्रिय काम केल्यानंतर सचिन कदम यांनी राजीनामा दिल्याने इतर शिवसैनिकही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. अनंत गीते आणि विनायक राऊत यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून सचिन कदम यांची ओळख होती. सचिन कदम यांच्या पुढच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. सचिन कदम यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा सुरु झालीये.
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा! | प्रमुख उपस्थिती - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | मुंबई - #LIVE https://t.co/oKeGbpAjdh
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 25, 2025Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा झटका, 40 वर्ष सोबत असलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; 'ऑपरेशन धनुष्यबाण'ला सुरुवात?https://t.co/xfIt2p5m0B
— ABP माझा (@abpmajhatv) January 24, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या