कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, उदयसिंह उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम झाला, अजित पवारांची प्रतिक्रिया
कराडमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysinh Undalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Ajit Pawar : कराडमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysinh Undalkar) यांनी हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. उदयसिंह उंडाळकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम होत आहे, याचा मला आनंद असल्याचे अजित पवार म्हणाले. 35 वर्षाच्या राजकीय जीवनाचा अनुभव आहे. मी विलास काकांसोबत राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक, मंत्री मंडळात काम केल्याचे अजित पवार म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्राची ताकद उदयसिंह उंडाळकर यांच्या मागे उभी करणार
यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीमध्ये रयत संघटनेचे प्रमुख उदयसिंह उंडाळकर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मी आलो आहे. 35 वर्षाच्या राजकीय जीवनाचा अनुभव आहे, मी विलास काकांसोबत राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक, मंत्री मंडळात काम केलं आहे. उदयसिंह उंडाळकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम होत आहे याचा मला आनंद आहे असे अजित पवार म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अपक्ष विलास काका उंडाळकर लढले, विलास काका 2014 ला घडाळाच्या चिन्हावर निवडणूक लढले असते तर त्यावेळीच निकाल वेगळा असता असे अजित पवार म्हणाले. भारतातील सर्वात जास्त नफा कमावून देणारी बँक विलास काकांच्या नेतृत्वाखालची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. सहकारासह राजकारण करत त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन उदयसिंह दादा राजकारण करत आहेत. उदयसिंह उंडाळकर यांची आगीतून उठून फुफुटामध्ये आलोय अशी अवस्था होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राची ताकद उदयसिंह उंडाळकर यांच्या मागे उभी करणार आहे. विलास काकांचं पाण्याचे स्वप्न उदयसिंह उंडाळकरांच्या माध्यमांतून आपण पूर्ण करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:


















