Aaditya Thackeray: पुन्हा नाशिक शिवसंवाद दौरा, आदित्य ठाकरे करणार गोडसेंच्या होमपीचवर बॅटिंग!
Nashik: शिंदे गटाने ठाकरे गटाला सुरुंग फोडल्यानंतर पहिल्यांदा आदित्य ठाकरे (aaditya thackeray) नाशिक दौऱ्यावर येत असून यात सोमवार, मंगळवार रोजी जिल्ह्यातील विविध भागांत संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे
Nashik: शिंदे गटाने ठाकरे गटाला सुरुंग फोडल्यानंतर पहिल्यांदा आदित्य ठाकरे (aditya thackeray) हे नाशिक दौऱ्यावर येत असून यात सोमवार आणि मंगळवार रोजी जिल्ह्यातील विविध भागांत संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. शिवसेनेचा नाशिक जिल्हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र सत्तांतरांनंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. ठाकरे गटातील महत्त्वाचे शिलेदार शिंदे गटाने गळाला लावले. त्यामुळे आता ठाकरे गटाला उभारी देणं गरजेचं आहे. याचसाठी आदित्य ठाकरे नाशिकच्या मैदानात पुन्हा बॅटिंग करणार आहेत. दोन दिवस दौरा असून यात इगतपुरी तालुक्यातुन सुरवात होऊन दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत ते जिल्ह्यातील विविध भागात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण आहे. नाशिकरोड येथे सोमवारी आनंदऋषीजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात जंगी जाहीर सभा होणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत असल्याने ठाकरे गटाने संवाद दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक देखील पार पडली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची युवकांमध्ये चांगली इमेज आहे. त्यामुळे ते या घटकांविषयी काय बोलतात, याचीच सर्वाना उत्सुकता आहे. गद्दारांनी दगा दिल्यानंतरही न डगमगता आदित्य ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवल्याने त्यांचे करावे तितके कौतुक थोडे आहे. तर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की आदित्य आगामी महापालिका निवडणुकांत ठाकरे गट निर्विवाद विजय मिळवेल आणि पक्षाची एकहाती सत्ता येईल यात शंका नाही. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी आदेशाची वाट न बघता सर्व शक्तीनिशी कामाला लागून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करावे. तसेच बालेकिल्ल्यात होणाऱ्या सभेला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
दोन दिवसीय नाशिक दौरा
दिवस पहिला : 06 फेब्रुवारी 2023
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (संवाद) येथे दुपारी 12.45 वाजता, सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा (संवाद) येथे दुपारी 02.30 वाजता, सिन्नर, नाशिक (संवाद) येथे सायंकाळी 03.45 वाजता, नाशिक शहराजवळील पळसे (संवाद) येथे सायंकाळी 04.45 वाजता, नाशिक (मेळावा) येथे सायंकाळी 05.45 वाजता...
मंगळवार 7 फेब्रुवारी रोजी
निफाड तालुक्यातील चांदोरी (संवाद) येथे सकाळी 11.15 वाजता, निफाड तालुक्यातील विंचूर येथील निसर्ग लॉज, दुपारी 01.00 वाजता, नांदगाव येथे दुपारी 03.00 वाजता. यानंतर पुढे औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावला रवाना होतील.
शिवसंवाद दौऱ्याचा सातवा टप्पा
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आता सुरु होत असून, 6 जानेवारी म्हणजेच उद्यापासून यात्रेला सुरुवात होत आहे. एकूण चार दिवसांची ही शिवसंवाद यात्रा असणार असून, नाशिक, औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयातून जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते. तर आता याच यात्रेचा हा सातवा टप्पा असणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.