Supriya Sule : 'काय पक्ष आणि चिन्ह... अरे भावाने मागितलं असतं तर सर्वकाही दिलं असतं' : सुप्रिया सुळे
Supriya Sule, तुळजापूर : "बहीणीचे प्रेम पाहा. ती 1500 रुपयांसाठी ती तुमच्यावर प्रेम करत नाही. त्यामध्ये काही ती मनापासून प्रेम करते. त्यामध्ये पैसे येतच नाहीत. अरे भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं. काय पक्ष आणि चिन्ह.. काहीही मागितलं असतं तरी दिलं असतं."
Supriya Sule, तुळजापूर : "बहीणीचे प्रेम पाहा. ती 1500 रुपयांसाठी ती तुमच्यावर प्रेम करत नाही. त्यामध्ये काही ती मनापासून प्रेम करते. त्यामध्ये पैसे येतच नाहीत. अरे भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं. काय पक्ष आणि चिन्ह.. काहीही मागितलं असतं तरी दिलं असतं. रिकाम्या हाताने आले होते आणि तसंच जाणार आहे. मी काय गठूड घेऊन जाणार आहे का? भावाने मागून तरी पाहायचं, एकदाही विचार केला नसता", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा तुळजापुरात (Tuljapur) पोहोचली. यावेळी त्या बोलत होत्या.
व्यवहारात पैसे असतात, नात्यात प्रेम आणि विश्वास असतो
सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, लाडकी बहीण योजना चांगली आहे. सगळी सरकार चांगली कामं करत असतात. योजनेचे टाईमिंग पाहा. सरकारला दोन अडीच वर्ष झाले. यांना कधीच बहीण लाडकी वाटली नाही. लोकसभा निवडणूक झाली की त्यांना बहीण लाडकी वाटू लागली. त्यांना नाते आणि व्यवहारातील फरक समजत नाही. व्यवहारात पैसे असतात. नात्यात प्रेम आणि विश्वास असतो. नात्यामध्ये पैसे येत नाहीत. व्यवहारात प्रेम येत नाही. भावा-बहीणीच्या नात्याला 1500 रुपयांची किंमत लावली.
त्यांना वाटतं 1500 रुपये दिलं की आमच्यावर कोणताही अन्याय करु शकता
पुढे बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. 1500 रुपये दिल्यामुळे आम्ही नात्यात वाहून जाऊ असं यांना वाटतय. हा सरकारचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं 1500 रुपये दिलं की आमच्यावर कोणताही अन्याय करु शकता. याचं कारण दोन सत्तेमधील आमदार काय म्हणाले पाहा. एक आमदार म्हणाले मतदानावर माझं बारीक लक्ष आहे. दीड हजारचे तीन करु शकतो. मात्र, आमच्या विरोधात मतदान झालं तर पैसे परत घेऊ शकतो. माझी त्या आमदारांना विनंती तू पैसे घेऊनच दाखव.
सातबारा कोरा करतोय मतदान नाही झालं तर कोरा करणार नाही, असं कोणीही म्हटलं नव्हत
दुसरा आमदार म्हणाले, मी त्यांना ओळखत नाही. पण पत्रकारांमुळे समजलं. ते म्हणाले डिसेंबरमध्ये पैशांची स्क्रुटीनी होणार आहे. बुथमध्ये मतदान झाले असले तरच पैसे मिळतील. त्यांचा गैरसमज झालाय की त्यांचीच सत्ता येणार आहे. पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली. तेव्हा कोणीही म्हटलं नाही की, सातबारा कोरा करतोय मतदान नाही झालं तर कोरा करणार नाही, असं कोणीही म्हटलं नव्हत. कर्जमाफी राजकीय विषय नव्हता. निवडणुकीसाठी नव्हता. शेतकरी अडचणीत आला होता, त्याला मदतीसाठी कर्जमाफी केली होती. आताचे सरकार सुख-दु:खाचे सरकार नाही, असंही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या