Supriya Sule: 'देवाभाऊ'च्या सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला गंभीर ईशारा
Supriya Sule in Nashik : 1 महिन्यात देवा भाऊच्या सरकारने कर्जमाफी केली नाही. तर 'देवाभाऊ'च्या सरकारला राज्यात फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा देत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Supriya Sule in Nashik : शरद पवार (Sharad Pawar) कृषिमंत्री असताना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकरी आज अडचणीत असताना अशी कर्जमाफी का होत नाही? इथले शेतकरी आम्हाला भेटले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 65 हजार सभासद आज अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्याचे काम आम्ही करू. शिवाय दिल्लीत आम्ही 8 खासदार या संदर्भात आवाज उठवू. हा मोर्चा म्हणजे एका मोठ्या कामाची छोटी सुरवात आहे. आज विनम्रपणे आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कर्जमाफी संदर्भात सांगा. त्यानंतर जर एक महिन्याच्या आत आम्हाला कर्जमाफी दिले नाही तर आम्ही सरकारला कुठेही फिरू देणार नाही. 1 महिन्यात देवा भाऊच्या सरकारने कर्जमाफी केली नाही. तर 'देवाभाऊ'च्या सरकारला राज्यात फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा देत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्या नाशिक येथे आयोजित शेतकरी आक्रोश मेळ्याव्यात बोलत होत्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार आणि आमचा पक्ष आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही 8 खासदार, कृषिमंत्री आणि पंतप्रधान यांना भेटून कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा आणि मागणी करू. शिवाय तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची योग्य वेळ, पण....
महाराष्ट्र समोर अनेक आव्हाने आहेत. 15 वर्षांपूर्वी जी स्थिती होती आता तशी परिस्तिथी नाही. सरकारने कितीही सांगितले इन्व्हेस्टमेंट आल्या पण तसे नाही. डेटा तसा सगळं सांगतोय. हिंजवडीत नोकऱ्या गेल्या. टेरिफमुळे आपल्या सॉफ्टवेअरचे काय होईल सांगता येत नाही. अर्थव्यवस्था ज्या वेगाने पुढे जायला पाहिजे होती, तशी गेलेली नाही. जीएसटीत बदल केले त्याचे स्वागत करते, पण त्यात उशिर केलाय. काळ ठरवेल किती बदल होईल. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. लाडक्या बहिन योजनेची २५ लाख नावे कमी झाली. सध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. त्यामुळे योग्य वेळ आली आहे. महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. नाशिकमधील शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी शेतात काळे झेंडे लावले आहेत. दर 3 तासाला शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतोय, हे मकरंद आबाचे वाक्य आहे. असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या






















