Sudhir Mungantiwar : भावा-बहिणीच्या वक्तव्याची अर्धवट क्लिप का फिरवताय? सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, काँग्रेसच्या जुलमाविरोधात बोलत राहण्याचा निर्धार
Sudhir Mungantiwar : भाजप उमेदवार आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यावर आता मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.भावा-बहिणीच्या वक्तव्याची अर्धवट क्लिप का फिरवताय? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
Sudhir Mungantiwar : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections 2024) पहिल्या टप्प्यातील (Lok Sabha Election First Phase Voting) मतदानाचा दिवस जसाजसा जवळ येत चालला आहे, तस तसे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. आरोप-प्रत्यारोपाा धुरळा उडला असताना पंतप्रधान मोदी यांच्या चंद्रपूर येथील जाहीर सभेने राजकीय वातावरण आणखीच तापवले आहे. भाजप उमेदवार आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांच्या भाषणावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यावर आता मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.भावा-बहिणीच्या वक्तव्याची अर्धवट क्लिप का फिरवताय? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. काँग्रेसने केलेल्या जुलमाविरोधात बोलत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर येथे सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर सडकून टीका करणारे भाषण केले होते. या भाषणातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या भाषणावरून मुनगंटीवार यांच्यावर टीका सुरू आहे. त्यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत आपल्या भाषणाची क्लिप ट्वीट केली आहे.
सुधीर मुनंगटीवार यांचा पलटवार
सुधीर मुनंगटीवार यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपावर म्हटले की, 1984 साली काँग्रेसने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप व्हायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही असा इशाराही दिला. 1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोकपणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नसल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
१९८४ साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेस ने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. १९८४ च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोक पणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या… pic.twitter.com/05Z5ecyaEY
— Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar) (@SMungantiwar) April 8, 2024
विरोधकांनी काय म्हटले?
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असांस्कृतिक आहे हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितलं असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अशा विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य धडा शिकवेल असेही त्यांनी म्हटले.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असांस्कृतिक आहे हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितलं.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) April 9, 2024
महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अश्या विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य धडा शिकवेल. #LokSabhaElections2024 pic.twitter.com/Kiyzdn3XeT
तर, काँग्रेसचे प्रदेश महासचिव सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. "एका भावाला बहिणीबरोबर " सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला असल्याचे त्यांनी म्हटले.
निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. "एका भावाला बहिणीबरोबर " सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 8, 2024
नुकतेच "आप"च्या मंत्री आतिशी यांनी… pic.twitter.com/orr8dw6yYl
सुधीर मुनगंटीवार वापरलेली भाषा ही समस्त भारताच्या संस्कार आणि संस्कृतीचा अपमान करणारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. भाऊ-बहिणीच्या नात्यावर या भाषेत बोलणे, हे नेहमी आपले वेगळेपण सांगणाऱ्या भाजपला शोभते का? असा सवाल त्यांनी केला होता.
जी काही भाषा सुधीर मुनगंटीवार यांनी वापरली आहे. ती भाषा समस्त भारताच्या संस्कार आणि संस्कृतीचा अपमान करणारी आहे. भाऊ - बहिणीच्या नात्यावर या भाषेत बोलणे, हे नेहमी आपले वेगळेपण सांगणाऱ्या भाजपला शोभते का? त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हेच जर भाजपचे संस्कार असतील तर या देशाचे काही… pic.twitter.com/ZNIu5FlOsJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 8, 2024