श्रीरंग बारणेंची लढाई शिवसैनिकाविरोधातच होणार, उमेदवारी मिळताच म्हणाले..
Shrirang Barne vs Sanjog Waghere : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने आज लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
![श्रीरंग बारणेंची लढाई शिवसैनिकाविरोधातच होणार, उमेदवारी मिळताच म्हणाले.. Srirang Barane's fight will be against ShivSainik of Uddhav Thackeray Maval Loksabha Maharashtra Politics Marathi News श्रीरंग बारणेंची लढाई शिवसैनिकाविरोधातच होणार, उमेदवारी मिळताच म्हणाले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/c46ebf21ac2d61c2ee141f725e0fb3dc1711642431666924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shrirang Barne vs Sanjog Waghere : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने आज लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमधून शिंदेंनी 8 लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला मावळची जागा आली असून श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय महाविकास आघाडीत हा जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे (Shrirang Barne) तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे आमने-सामने असणार आहेत.
मित्रपक्ष महायुतीचा धर्म नक्की पाळतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी जाहीर करताच श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कुटुंबीयांच्या आनंदाला ही पारावर उरला नाही. आता बारणेंचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंसोबत होणार आहे. उमेदवारी जाहीर होताच श्रीरंग बारणे (Shrirang Barne) म्हणाले, "मी हॅटट्रिक मारणार आहे. भाजप आणि अजित पवार गटाची नाराजी उमेदवारी जाहीर होईपर्यंत होती. आता मित्रपक्ष महायुतीचा धर्म नक्की पाळतील", असा विश्वास श्रीरंग बारणेंनी व्यक्त केला.
श्रीरंग बारणेंविरोधात ठाकरेंचे संजोग वाघेरे मैदानात
मावळ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली. तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंचे शिवसैनिक श्रीरंग बारणे मैदानात उतरले आहेत. संजोग वाघेरे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. मात्र, त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. 2019 मध्येही वाघेरे यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र, पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांनी माघार घेतली. मावळ मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते म्हणाले, मावळमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी माझा लढा आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे 8 उमेदवार जाहीर
संजय मंडलिक - कोल्हापूर
सदाशिव लोखंडे - शिर्डी
राजू पारवे - रामटेक
धैर्यशील माने - हातकणंगले
प्रतापराव जाधव - बुलढाणा
हेमंत पाटील - हिंगोली
श्रीरंग बारणे - मावळ
मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)