एक्स्प्लोर

Rashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का! रश्मी बर्वेंचं सकाळी जातप्रमाणपत्र रद्द, संध्याकाळी उमेदवारी अर्जच बाद केला

Ramtek Lok Sabha Election : उमेदवारी अर्जासोबत जोडलेलं जात प्रमाणपत्र वैध नसल्याचं कारण देत रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यांच्या पतीचा अर्ज मात्र वैध ठरला आहे.

नागपूर : काँग्रेसच्या रामटेकच्या (Ramtek Lok Sabha Election) उमेदवार रश्मी बर्वेंचा (Rashmi Barve) उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गुरूवारी सकाळी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं होतं. तर संध्याकाली अर्ज बाद करण्यात आला आहे. काँग्रेसने रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, त्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. रश्मी बर्वेंचे पती श्याम बर्वे यांनी यावेळी डमी अर्ज भरल्याने आता तेच रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. 

जात प्रमाणपत्र वैध नसल्याचं कारण देत निवडणूक आयोगाने काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला. मात्र रश्मी बर्वेंचे पती श्याम बर्वे यांचा अर्ज ग्राह्य धरलाय.

महायुतीकडून जात प्रमाणपत्रावर आक्षेप

या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी पार पडली. त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रावर महायुतीसह अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला.

रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र तयार करताना खोटी कागदपत्रं जोडली, त्यामुळे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र कसे खोटे आहे हे महायुतीच्या नेत्यांनी वकिलामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पटवून दिलं. त्यामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज टिकतो की बाद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं 

महायुतीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अर्जाची छानणी करण्यात आली आणि त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं. त्यानंतर आता त्यांची उमेदवारीही रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.  

रश्मी बर्वेंच्या पतीचा अर्ज वैध

रश्मी बर्वे यांचे पती शाम बर्वेंचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आल्यामुळे आता तेच काँग्रेसचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला थोडा दिलासा मिळाला आहे. 

रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या किशोर गजबियेंनी आपण प्रशासकीय अधिकारी असल्याने रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र बाद ठरणार असल्याचा इशारा काँग्रेसला दिला होता. मात्र रीही पक्षाने बर्वेंनाच उमेदवारी दिली. दुसरीकडे किशोर गजभियेंनी वंचित आघाडीची साथ घेत रामटेकमधून उमेदवारी अर्जही दाखल केला.  

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नाराZero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget