एक्स्प्लोर

Sanjay Gaikwad : निवडणुकीत इतकं तितकं होत असतं, हा काय बिहार थोडी आहे; मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, पोलिसांवर फोडलं प्रकरणाचं खापर

Sanjay Gaikwad : मुलगा कुणाल गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांनाच खडे बोल सुनावले आहे.

Sanjay Gaikwad : बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचा मुलगा कुणाल गायकवाड (Kunal Gaikwad) आणि नातेवाईक श्रीकांंत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला (Bogus Voter) पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत आता स्वतः आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांनाच खडे बोल सुनावले आहे. तर बुलढाण्यात पोलिसांनीच दहशत माजवली, असा दावाही संजय गायकवाड यांनी केलाय.

Sanjay Gaikwad : निवडणुकीत इतकं तितकं होत असतं....! हा काय बिहार थोडी आहे?

बुलढाण्याबाबत का जे -जे दाखवल्या गेल्या त्यातून बुलढाण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अनेक मतदारांची नावे हे वेगवेगळ्या प्रभागात आहे. इकडे गेले की पुन्हा तिकडे आणि तिकडे गेले की पुन्हा इकडे पाठवतात. मी आणि माझी पत्नी एका बुथवर गेलो तर त्यांनी सांगितलं की तुमचं नाव दुसऱ्या बूथवर आहे. काल एका मुलाला इकडे नाव नव्हतं म्हणून दुसऱ्या प्रभागात पाठवलं आणि त्याला तिकडे मारलं. इतरांना त्याला मारायचा अधिकार नाही. त्याला मारत होते तेवढ्यात माझा मुलगा तिथे गेला आणि तो माझ्या मुलाला चिटकला. की, मला वाचवा वाचवा म्हणून इतर अजून कोणी मारेल म्हणून. त्या मुलाला इथून तू निघून जा, असं माझा मुलगा म्हटला, तर त्याचं काय चुकलं? निवडणुकीत इतकं तितकं होत असतं....! हा काय बिहार थोडी आहे? आमच शहर सुशिक्षित आहे. अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिलीय. ते बुलढाण्यात बोलत होते.

Sanjay Gaikwad : माझा मुलगा त्याला वाचवायला गेला, त्याचं काहीही चुकलेलं नाही

बुलढाण्यात कमी मतदानाचे कारण म्हणजे मतदारयादीत मृत लोकांचे नाव खूप आहेत. दुबार नावही आहेत. ते नाव निवडणूक आयोगाने आधी काढायला पाहिजे. याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. इतर लोक त्या बोगस मतदार तरुणाला मारत होती, त्यामुळे माझा मुलगा त्याला वाचवायला गेला. त्याचं काहीही चुकलेलं नाही. त्या (विजयराज शिंदेला) जनतेने नाकारलं, व आता त्याची डिपॉझिट जायची वेळ आली. भाजपच्या मतदाराने ही त्याला नाकारलं. माझ्या प्रभागात चाळीस वर्षापासून एकतर्फी जागा जिंकल्या जातात. पंधरा वर्षापासून हा त्याच्या आमदार असताना वार्डात जिंकला नाही.

Sanjay Gaikwad : निवडणूक आयोग महाराष्ट्राला वेठीस का धरतो?

दरम्यान, निवडणूक आयोगाला निकाल लांबवण्याची गरज नव्हती. या निवडणुकीचा आणि त्या निवडणुकीचा काहीही फरक पडणार नाही. यामुळे नगर परिषदेचे प्रशासकीय कामे मागे पडतील. निवडणूक आयोग महाराष्ट्राला का वेठीस धरतो आहे हे कळत नाही. या निवडणुकीत कुठेही घोळ झालेला नाही आणि जो झालेला आहे तो निवडणूक आयोगाचा घोळ आहे. यांनी जिल्हा परिषदपर्यंत तरी हे याद्या क्लिअर करायला पाहिजेत. असेही संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले.

हेही वाचा

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
Embed widget