(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivaji Kalge : मोठी बातमी : लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्रावर न्यायालयात याचिका दाखल
Shivaji Kalge, Latur : लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Shivaji Kalge, Latur : लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकिल योगेश उदगीरकर यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे.
योगेश उदगीरकर काय काय म्हणाले?
लोकसभेचा निकाल लागून आज 46 वा दिवस आहे. 45 दिवसांची हायकोर्टाची इलेक्शन पीटीशन दाखल करण्याची मुदत होती, ती काल संपलेली आहे. लातूरचे निवडून आलेले उमेदवार काळगे यांच्याविरोधात आम्ही पर्वा रीट पीटीशन दाखल केली आहे. आपण त्यांच्याविरोधात दोन केसेस दाखल केलेल्या आहेत. आपण त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला चॅलेंज केलेलं आहे. दुसरं म्हणजे इलेक्शन पीटीशनही आपण दाखल केलेली आहे, असं योगेश उदगीरकर म्हणाले.
शिवाजी काळगे यांनी 1986 साली जात प्रमाणपत्र काढलं होतं
पुढे बोलताना योगेश उदगीरकर यांनी सांगितले की, शिवाजी काळगे यांनी 1986 साली जात प्रमाणपत्र काढलं होतं, ते औरंगाबादच्या आयुक्तांनी रद्द केलं. त्यांनी त्याठिकाणी सांगितलं की दिनांक 5 डिसेंबर 1985 अन्वये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. म्हणजेच ज्यांनी त्यांचं जात प्रमाण काढणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असं आयुक्तांनी म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र शासनानेही त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं.
लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती.
भाजपाने दोन वेळेस इथे प्रचंड मताधिकाने विजय मिळवला होता, मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच हादरा बसला. यावेळेस हॅट्रिक करण्यासाठी भाजपाने सर्व प्रयत्न केले. मात्र मतदारांनी कौल डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या बाजूने दिला. डॉक्टर शिवाजीराव काळगे (Shivajirao Kalge) यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मते मिळवण्यात यश आलं होतं. तर निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधाकर शृंगारे यांना पाच लाख 47 हजार 140 मते पडली. डॉक्टर शिवाजी गाडगे यांनी 61,881 मताची भरघोस आघाडी मिळवून यश संपादन केलं होता. अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव होता. यावेळेस काँग्रेसने लिंगायत समाजातून येणाऱ्या डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आणि चुरस निर्माण झाली होती. भाजपने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांना संधी दिली. मराठा आरक्षणाच्या विषयामुळे नाराज असलेला मराठा समाज भाजपापासून दुरावला होता, त्यामुळे काँग्रेसला यश मिळाल्याचं बोललं गेलं.
Dr Shivaji Kalge latur MP : शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्रावर याचिका
इतर महत्वाच्या बातम्या
Gulabrao Patil vs Gulabrao Deokar : विधानसभेची चाहूल लागताच दोन गुलाबराव भिडले, एकमेकांवर सडकून टीका, जळगावात राजकीय गरमागरमी!