एक्स्प्लोर

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीने आमचा विजय सोपा, सोमय्यांनी स्टार प्रचारक म्हणून यावं; ठाकरे गटाची प्रतिक्रिया

Loksabha Election:रवींद्र वायकरांना उमेदवारी, शिंदे गटाचे अभिनंदन, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, पहिली लीड जोगेश्वरीतून मिळण्याची खात्री! सगळ्यात शेवटी शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र वायकरांना उमेदवारीची लॉटरी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उत्तर पश्चिम मुंबई (Mumbai North west) अर्थात वायव्य मुंबईतून उमेदवारी दिली. त्यामुळे आता रवींद्र वायकर यांचा सामना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्याशी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत रंगणार आहे. दरम्यान,  रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन आमची उत्तर पश्चिम मुंबईची लढाई आणखी सोपी केली आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

सचिन अहिर म्हणाले, "मी शिंदे गटाचे अभिनंदन करतो. तुम्ही आम्हाला ही निवडणूक सोपी करुन दिली. रवींद्र वायकर हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी कुठल्या परिस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु जोगेश्वरीमधून रवींद्र वायकर निवडून येत होते, तिथेच पहिलं लीड आम्हाला मिळेल. ही निवडूक आम्हाला सोपी झाली"

यावेळी सचिन अहिर यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही हल्लाबोल केला. वायकर यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होता, किरीट सोमय्या यांनीही त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली होती. त्यावर सचिन अहिर म्हणाले, "किरीट सोमय्या यांनी आता स्टार प्रचारक म्हणून रवींद्र वायकर यांच्या प्रचाराला यावं. भाजप सोडा पण अंतर्गत पक्षात उमेदवार मिळत नाही म्हणून नाईलाजास्तवर वायकर यांना उमेदवारी दिली. मुंबईच्या सर्व जागांवर त्यांना उमेदवार बदलावा लागला, नवे उमेदवार द्यावे लागतात, इथेच आमचा विजय आहे"

अमोल किर्तीकर नवखे उमेदवार, मला अनुभव आहे असं रवींद्र वायकर म्हणाले होते. त्यावर सचिन अहिर म्हणाले, उमेदवारापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाऊन वायकरांना उमेदवारी दिली आहे. वायकर हे उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणार आहेत का? त्यांना कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतला हे सर्वांना माहिती आहे. उद्या त्यांचा पराभव होणार आहे, त्यामुळे त्यांना विधानसभेला उमेदवारी देणार आहेत का? त्यांनी मुंबई महापालिकेची तयारी करावी, असं सचिन अहिर म्हणाले. 

आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या 

सचिन अहिर म्हणाले, "रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन आमची उत्तर पश्चिम मुंबईची लढाई आणखी सोपी केली आहे. रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मी काही प्रश्न उपस्थित करतो याची उत्तरे मिळावी. रवींद्र वायकर प्रचार करताना उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलतील का? भाजपचे किरीट सोमय्या स्टार प्रचारक म्हणून रवींद्र वायकर यांचा प्रचार करतील का? जर ते खासदारकीला पराभूत झाले  तर त्यांना पुन्हा महापालिकेसाठी तयारी करावी लागणार का?", असा खोचक सवाल अहिर यांनी उपस्थित केला. 

आणखी वाचा

जीवाभावाच्या सहकाऱ्यांची साथ सोडण्यापूर्वी रवींद्र वायकर गणपतीच्या दर्शनाला, उद्धव ठाकरेंचा विषय निघताच डोळे पाणावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Embed widget