एक्स्प्लोर

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad : मला निवडणूक लढवावी वाटली म्हणून नामांकन दाखल केलं, तूर्तास तरी उमेदवारी मागे घेणार नाही, निवडणूक लढवण्यावर संजय गायकवाड ठाम

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad on Lok Sabha Candidacy: नवी दिल्ली : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात (Buldhana Lok Sabha Constituency) शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटासमोर (Shinde Group) नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचं नाव आहे. मात्र, त्यांचं नाव जाहीर होण्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी तडकाफडकी जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार संजय गायकवाड आपला अर्ज मागे घेतील, असं खासदार प्रतापराव जाधव म्हणाले आहेत. मात्र, आपण अर्ज मागे घेणार नसल्याची एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. मी बंड केलेलं नाही, मात्र मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. 4 तारखेनंतर कळेल काय होतं, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. 

मला निवडणूक लढवावी वाटली म्हणून मी नामांकन दाखल केलं, तूर्तास तरी उमेदवारी मागे घेणार नाही, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. चार तारखेनंतर काय होतं ते कळेल, असंही ते म्हणाले आहेत. पक्षाकडून लोकसभेची यादी जाहीर होण्यापूर्वीच संजय गायकवाडांनी जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अशातच आता पुन्हा एकदा आपण निवडणूक लढणार असल्याचा निर्धार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मी बंड केलेलं नाही, असाही पुनरुच्चार संजय गायकवाड यांनी बोलताना केला आहे. 

लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज मी अचानकपणे केलेला नाही : संजय गायकवाड

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड बोलताना म्हणाले की, "मी निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं अर्ज दाखल केला आहे. लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज मी अचानकपणे दाखल केलेला नाही. काल (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा पहिला दिवस होता. मी आधीपासूनच ठरवलेलं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं. फक्त दरवेळी मी पाच-पन्नास हजार लोकं सोबत घेऊन जातो आणि उमेदवारी अर्ज दाखल करतो. यावेळी फक्त पाचचजणांसोबत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला."

मी निवडणूक लढवण्यावर ठाम : संजय गायकवाड 

"जे समाजात काम करत नाही, ज्यांना लोकं ओळखत नाहीत, असे लोक निवडणुकीची तयारी करतात. मी चोवीस तास लोकांसाठी काम करत असतो. राज्यभर काम करतो. त्यामुळे मी चोवीस तास तयारी करत असतो.", असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, "माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत अद्याप काहीच ठरलेलं नाही. प्रतापराव जाधव आणि माझी जी भेट झाली, त्यामध्ये याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. अजूनतरी माझा अर्ज कायम आहे. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. येणाऱ्या काळात दिसेलच सर्वांना. तुम्हीही आहात आणि आम्हीही आहोत."

पाहा व्हिडीओ : Sanjay Gaikwad : माझं कोणाविरोधात बंड नाही, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे उमेदवारी बुलढाण्यातून अर्ज

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या डोक्याचा ताप वाढला, संजय गायकवाड यांची बंडखोरी, दोन अर्ज भरले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषणABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Embed widget