एक्स्प्लोर

''राणे आता शिवसेनेला खुनी दिसू लागले, मुख्यमंत्री बनवले तेव्हा...'' शिवसेनेच्या माजी खासदारांचा घरचा आहेर

राज्यात शिवसेना (shivsena) आणि भाजप (BJP) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.

Shivsena leader Shivaji Mane : राज्यात शिवसेना (shivsena) आणि भाजप (BJP) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. आता या वादामध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने (Shivaji Mane) यांनी उडी घेत शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकत स्वतःचे मत व्यक्त केले आहे. "राणे आता शिवसेनेला खुनी दिसू लागले आहेत, मुख्यमंत्री बनवलं होतं तेव्हा ते काय धुतल्या तांदळाचे होते का? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. 

राणे आता शिवसेनेला खुनी दिसू लागले आहेत का?

"ईडी चे घोटाळे सर्व काढा परंतु राज्यसभेत आणि लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडा, ईडी चे काय वाकडे होते ते सगळ्यांना माहीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की कोणी किती कष्टाने कमाई केली आहे ते.. संजय राऊत कोण होते त्यांचा पगार किती होता किंवा राणे यांचा व्यवसाय कोणता होता...इतकेच नाही तर नारायण राणे आता खुनी दिसू लागले आहेत का? मुख्यमंत्री पदावर त्यांना बसवली तेव्हा ते धुतल्या तांदळाचे होते का?" असा सवाल त्यांच्याच पक्षाला म्हणजे शिवसेनेला केला आहे. 

मुंबईत शिवसेना वाढली, तेव्हा राणेच होते..

"मुंबईत जी शिवसेना वाढली, ज्यात मोजून काही मंडळी होती त्यात राणे होते. उगाच शिळ्या कढीला ऊत काय आणता शेवटी तुम्ही आम्ही सर्वजण एका फाटक्या शिवसैनिकाच्या जीवावर मोठे झालो आहोत हे विसरून चाललो हे मात्र नक्की..." अशा आशयाची फेसबुक पोस्ट माजी खासदार शिवाजी माने यांनी करून शिवसेनेला जणू घरचाच आहेर दिला आहे.

राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पाहणीसाठी पालिकेचं पथक रवाना

दरम्यान,  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) पथकाकडून गेल्या तासभरापासून पाहणी सुरू आहे. तर नारायण राणे आज स्वतः अधीश बंगल्यात उपस्थित आहेत. अधीश बंगल्यात अनियमिततेचा संशय उपस्थित करत मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज मुंबई महापालिकेचं पथक अधीश बंगल्यात (Narayan Rane Bungalow) धडकलं आहे. दरम्यान अधीश बंगला पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा नारायण राणेंनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी काय पाहणी करणार, असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. 

आज पालिका अधिकारी राणेंच्या अधिश बंगल्यात काय पाहणी करणार?

मुंबई महापालिकेकडे 2017 पासून राणे यांच्या अधिश बंगल्याबाबत तक्रार आहे. या तक्रारीत राणेंचा बंगला बांधताना सीआरझेडचे उल्लंघन झालं, तसेच बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं असल्याचा उल्लेख आहे. यासंदर्भातच तपास करण्यासाठी मुंबई पालिका अधिकाऱ्यांचं पथक पहाणी करणार आहे. गेल्या आठवड्यात पालिकेनं नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये तुमच्या बंगल्याबाबत काही तक्रारी आहेत. यासंदर्भात तपासणी करायची आहे. तसेच, बंगल्याची आवश्यक ती कागदपत्र तुम्ही तयार ठेवा, असं नारायण राणेंना कळवलं होतं.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget