राणेंच्या बंगल्याच्या बांधकामात अनियमितता, केंद्रकडूनही सीआरझेडची नोटीस : महापौर किशोरी पेडणेकर
Kishori Pednekar On Narayan Rane Bungalow BMC Action : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
Kishori Pednekar On Narayan Rane Bungalow BMC Action : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. आज मुंबई महापालिकेच्या पथकाने या बंगल्याची पाहणी केली. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी पालिकेने आधीच नोटीस बजावली होती. यावर बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत की, ''नारायण राणे यांना फक्त पालिकेनेच नाही तर केंद्र सरकारनेही सीआरझेडची नोटीस बजावली आहे. राणे यांच्या बंगल्यात अनियमितता जाणवत असल्याने त्यांच्या बंगल्याची पाहणी केली जात.''
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नारायण राणे यांना फक्त पालिकेनेच नाही, तर केंद्र सरकारनेही सीआरझेडची नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारनेही सांगितलं आहे की, सीआरझेडचं उल्लंघन झालं आहे. पालिकेचे पथकाकडून आज पहिल्यांदा ही पाहणी केली जात नाही आहे. स्वतः राणे यांनी सांगितलं आहे की, चार वर्षांपूर्वीही पालिकेकडून त्यांच्या बंगल्याची पाहणी झाली होती. तेव्हाही महापालिकेशी बोलल्यावर कळलं की, बंगल्याच्या बांधकामात अनियमितता जाणवत आहे आणि तेच पाहण्यासाठी ही पाहणी केली जात आहे. मनपा हे त्यांच्या पद्धतीने काम करते. यामध्ये नारायण राणे ही नक्कीच आम्हाला सहकार्य करतील, पत्रकारांशी बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.
मुंबई मास्क मुक्त होणार का?
मुंबईत रुग्ण संख्या कमी होत असल्याने मुंबई मास्क मुक्त होणार का? असा प्रश्न पेडणेकर यांना पत्रकारांनी विचारला असता त्या म्हणाल्या आहेत की, ''याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत मास्क घालावाच लागणार आहे. मार्चमध्ये यासंबंधित आढावा बैठक होईल. ज्यात याचा सविस्तर आढावा घेतला जाईल.'' राज्यात, मुंबईत कोरोना रुग्ण संख्या नगण्य झाली तर नक्कीच आपण मास्कमुक्ती बाबत विचार करू, असं त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक पोहोचलं आहे. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता त्यात बंगल्यावरुन सुरु झालेल्या वादाची भर पडली आहे. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? आणि आढळली तर अधीश बंगल्यावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: