एक्स्प्लोर

"शरद पवार आमचे नेते होते, आहेत, यापुढेही राहतील पण, सुप्रिया सुळे..."; सोनिया दुहान यांच्याकडून खंत व्यक्त, पक्ष सोडणार की, नाही केलं स्पष्ट!

Sonia Doohan on Sharad Pawar NCP : मी पक्ष सोडलेला नाही, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं राष्ट्रवादीच्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलं आहे.

Sonia Doohan on Sharad Pawar NCP : मुंबई : राष्ट्रवादीतील (NCP) अंतर्गत फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra News) वेगळं वळण लागलं आहे. पक्ष दोन गटांत विभागला गेला आहे. अशातच अनेक कार्यकर्त्यांनी थोरल्या पवारांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ देणं पसंत केलं. तर काहीज शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहण्यावर ठाम राहिले. अशातच गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विश्वासू आणि राष्ट्रावादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान (Sonia Doohan) अजित पवार गटात (Ajit Pawar Group) जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सर्व चर्चांना स्वतः सोनिया दुहान यांनी पूर्णविराम दिला आहे. माझी शरद पवारांवर निष्ठा कायम आहे, मी पक्ष सोडलेला नाही, असं सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्या सोनिया दुहान म्हणाल्या की, "मी पक्ष सोडलेला नाही, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. असं पाहायला गेलं तर, ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी सुप्रीया सुळेही तिथे दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला, असं म्हणायचं का? धीरज शर्मांसारखे सर्वच लोक शरद पवारांना का सोडत आहेत? मी आणि धीरज शर्मा आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील."

शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रीया सुळे यांच्यासाठी आम्हाला आदर आहे. पण, त्या आमच्या प्रमुख कधीच होऊ शकल्या नाहीत. लीडर होण्यात त्या कमी पडल्या, असं सोनिया दुहान म्हणाल्या आहेत. मी लवकर पक्ष जोडण्याचा निर्णय घेईन, मी सध्या इतर कोणता पक्ष जॉईन करणार नाही, सुप्रिया सुळेंना त्यांचं मंथन करण्याची गरज आहे. लोका त्यांना का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा, असंही सोनिया दुहान म्हणाल्या. 

कोण आहेत सोनिया दुहान?

सोनिया दुहान या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केले आहे. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. सोनिया दुहान यांनी हॉटेलमध्ये जात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते. 

पाहा व्हिडीओ : Sonia Duhan News : पवार साहेबांवर निष्ठा पण सुप्रिया सुळे लीडर बनू शकल्या नाही, याची खंत : दुहान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget