एक्स्प्लोर

पाडव्यानिमित्त शरद पवारांच्या भेटीगाठी, दादा समर्थक आमदारही भेटले, दादांची प्रतीक्षा, बेनके म्हणाले, सगळे एकत्र दिसतील!

Sharad Pawar Diwali Padwa : शरद पवारांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते बारामतीत (Govind Baug Baramati) दाखल झाले आहेत. दरवर्षी पाडव्यानिमित्त शरद पवार कार्यकर्त्यांना भेटून शुभेच्छा देतात. या वर्षीही प्रकृती बरी नसली तरीही शरद पवार परंपरेप्रमाणे कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत.  

बारामती, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Diwali) यांच्या बारामतीतील गोविंद बागेतील घरी दिवाळी पाडव्यानिमित्त (Diwali Padwa) गाठीभेटी होत आहे. शरद पवारांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते बारामतीत (Govind Baug Baramati) दाखल झाले आहेत. दरवर्षी पाडव्यानिमित्त शरद पवार कार्यकर्त्यांना भेटून शुभेच्छा देतात. या वर्षीही प्रकृती बरी नसली तरीही शरद पवार परंपरेप्रमाणे कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतर गोविंद बागेत हा पहिलाच दिवाळी पाडवा होत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार का याबाबतची उत्सुकता आहे. 

दरम्यान, आज सकाळपासूनच गोविंद बागेत लोक जमायला सुरुवात झाले. यावेळी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. सकाळी आठ वाजता शरद पवार, सुप्रिया सुळे हे शुभेच्छांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली.  

आमदार अतुल बेनके पवारांच्या भेटीला 

दरम्यान, राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला येत असताना, अजित पवार समर्थक आमदारांनीही शरद पवारांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी शरद पवारांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. "माझे वडील पवार साहेबांना भेटायला येत होते. मी सुद्धा सगळ्यांना भेटायला आलो आहे. यातून राजकीय अर्थ काढू नये. सगळे एकत्र राहायला पाहिजेत", असं अतुल बेनके म्हणाले.  

मी अजित पवारांनी भेटायला जाणार आहे. अजित पवार इथे असायला हवे होते. पुन्हा सगळे आपल्याला एकत्र दिसतील, असा विश्वासही अतुल बेनके यांनी व्यक्त केला.  

अजित पवार-शरद पवार जेवणासाठी एकत्र होते : मुश्रीफ 

अजित पवार आज गोविंद बागेत दिसत नसले तरी काल रात्री सर्व पवार कुटुंब एकत्र जेवणासाठी होते. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र श्रीनिवास पवार यांच्या घरी जेवणासाठी होते, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना सांगितलं.  

रोहित पवार दिवाळीनिमित्त बीडच्या कार्यालयात

दरम्यान, तिकडे रोहित पवार यांनी दिवाळीनिमित्त बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जमावाने पेटवून दिलं होतं. त्याच कार्यालयामध्ये रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत आणि इतर नेत्यांसोबत आज दिवाळी पाडवा साजरा करत आहेत.  पाडव्याच्या निमित्ताने एकीकडे बारामतीमध्ये दरवर्षी पाडव्याला अख्खं पवार कुटुंब एकत्र येत असतं, मात्र या पाडव्याला रोहित पवार हे कुटुंबासमवेत बीडमध्ये आहेत. 

VIDEO : अतुल बेनके नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

Mumbai : दिवाळीत फटाक्यांसोबत पोलिसांच्या 'ट्रिंग ट्रिंग'चा आवाज, 5000 हून अधिक तक्रारीचे फोन  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget