एक्स्प्लोर

Sharad Pawar : मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला अन् मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर धडकल्या VIDEO

Sharad Pawar, बीड : मस्साजोगहून परभणीकडे जात असताना शरद पवारांच्या ताफ्यातील कारचा अपघात झालाय.

Sharad Pawar, बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आज बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वन पर भेट घेतल्यानंतर परभणीकडे निघत असताना शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. शरद पवारांचे वाहन पुढे गेल्यानंतर ॲम्बुलन्सने अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. यात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गाडीचा देखील समावेश होता. मात्र सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाड्यांचे नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. दरम्यान आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट आज सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. 

शरद पवार म्हणाले, या हत्येने सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसलाय. बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात एक लौकिक आहे. मी अनेक वर्षापासून या ना त्या निमित्ताने या जिल्ह्याची संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्या वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपले आयुष्य जगणारे, दुष्काळ काळात त्याला तोंड देणारे, महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे आणि त्याप्रती कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर बीडचा उल्लेख हा केला जातो. अशा जिल्ह्यात जे काही घडलं हे कोणालाही न पटणारं, न शोभणारं अतिशय चमत्कारीक कशा प्रकारचं आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली. पंधरा वर्ष लोकांचा पाठिंब्याने त्या पदावर बसण्याचं काम ज्यांनी केलं. पंधरा वर्ष ज्याअर्थी निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाची समरस होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण, कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावांमध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याच्यात त्यांचा काही संबंध नसताना, कोणी येऊन कोणाला दमदाटी केली. कोणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कुणी बाहेरून येतं, व्यक्तिगत हल्ला केला जातो आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund SIP : शेअर बाजार अस्थिर असताना गुंतवणूकदारांनी म्युच्यूअल फंडावर विश्वास दाखवला, डिसेंबरमध्ये 26000 कोटींची गुंतवणूक
बाजार अस्थिर असताना देखील गुंतवणूकदार खंबीर, SIP वर विश्वास, डिसेंबरमध्ये 26 हजार कोटींची गुंतवणूक, आकडेवारी समोर
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund SIP : शेअर बाजार अस्थिर असताना गुंतवणूकदारांनी म्युच्यूअल फंडावर विश्वास दाखवला, डिसेंबरमध्ये 26000 कोटींची गुंतवणूक
बाजार अस्थिर असताना देखील गुंतवणूकदार खंबीर, SIP वर विश्वास, डिसेंबरमध्ये 26 हजार कोटींची गुंतवणूक, आकडेवारी समोर
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
Embed widget