एक्स्प्लोर

भाजपचं ठरलं! उदयनराजेंना साताऱ्याची उमेदवारी मिळणार, फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता

Satara Lok Sabha : सातारच्या जागेवर भाजपकडून उदयन राजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाणार आहे

Satara Lok Sabha : सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा सुटला आहे.  आजच सातारच्या जागेवर भाजपकडून  खासदार उदयनराजे भोसले  यांच्या  (Chhatrapati Udayanraje Bhosale)  नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाईल, अशी शक्यता आहे. तर  दुसरीकडे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी प्रफुल पटेलांनी केलीये. 

महायुतीत साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे. एकीकडे, ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे, मात्र दुसरीकडे, राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. तशी स्पष्ट भूमिका प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली आहे.  साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी प्रफुल पटेलांनी केलीये. तर दुसरीकडे आजच सातारच्या जागेवर भाजपकडून उदयन राजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाणार आहे . उदयनराजे यांची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

आज सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू

 सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी  तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांनी काल महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केल्यानंतर मतदारसंघात  भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला आहे.  सातारा येथे अजून भाजपने उमेदवार जाहीर केला नाही, कारण याजगी राष्ट्रवादीची जागा होती .  मात्र नाशिक राष्ट्रवादीला सोडून सातारा भाजप स्वतः कडे घेण्याच्या विचारात होते. मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही न सुटल्याने सातारा जागा देखील जाहीर झाली नव्हती. मात्र आज सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू, असा विचार करून उदयन राजे यांचे नाव जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिकचा तिढा सुटला?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षाचं कर्जत येथे शिबीर झालं होतं. अजित पवार यांनी सातारा, बारामती, रायगड आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार निवडणूक लढवतील, असं जाहीर केलं होतं.  यापैकी अजित पवारांनी बारामती, रायगड, शिरुर या ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघ देणार असाल तर साताऱ्याची जागा भाजपला सोडू अशी भूमिका अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यात येईल हे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखलSuraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठीABP Majha Headlines : 06 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Embed widget