Sanjay Raut : महाराष्ट्राला दररोज लुटणाऱ्या खोके सरकारला सत्तेतून घालवायचंय, संजय राऊत यांनी दिल्लीतील बैठकीत काय ठरलं ते सांगितलं
Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खोके सरकारला सत्तेतून घालवायचं असल्याचं म्हटलं.
नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांचा नवी दिल्ली दौरा, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची (MVA) रणनीती याबाबतची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी मल्लिकार्जून खरगे, शरद पवार, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह इतर नेत्यांसोबत भेट चर्चा केली. तीन पक्ष सर्व सांगतात काही सुरळीत चाललंय, असं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचा 16 ऑगस्टला मेळावा आहे. उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत, शरद पवार दौरा करणार आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात यावं, अशी चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिला. महाविकास आघाडीत समन्वय आहे तो दिल्लीत देखील तुम्हाला दिसला असेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
राज्यात आपण निवडणुकीला सामोरं जाताना, लोकांसमोर हातात हात घालून गेलं पाहिजे. कोणती मतभिन्नता असता कामा नये, कोण मोठा, कोण छोटा, कोण मधला असं असता कामा नये. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी असं ठरवलंय की सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही. कोणत्याही परिस्थिती राज्यातून खोके सरकार घालवायचं आहे, भाजपला राज्यातून हद्दपार करायचं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरु झालंय, पैशाचं राजकारण असेल, विषारी राजकारण असेल त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस, भाजप आणि अमित शाह आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावर कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही. कोणत्याही एका पक्षानं निर्णय जाहीर केल्यास त्यांनी चार भिंतीतील कराराचं उल्लंघन ठरेल, असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत दिल्लीत चर्चा केल्यावर काही वेगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता तर भाजपच्या अनेक जागांवर पराभव करता आला असता. आम्ही अनेक जागांवर कमी मतांनी पराभूत झालो. चेहरा विरोधी पक्षांना, निवडणुकीत आणि सत्ताधाऱ्यांना चेहरा असावा लागतो. राहुल गांधी देशातील विरोधकांचा चेहरा आहेत. राज्यात देखील विरोधी पक्षाच्या नेत्याला चेहरा असावा लागतो, असं संजय राऊत म्हणाला.
राज्यातील खोके सरकार लोकशाही मार्गानं घालवणार : संजय राऊत
उद्धव ठाकरे सातत्यानं जेव्हा या देशात मोदी शाह यांच्या अत्याचाराविरुद्ध कोणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नव्हते तेव्हा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांचा चेहरा बनले, असं संजय राऊत म्हणाले. जनतेला जे सांगायचं आहे ते सांगितलं आहे.शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्याकडे आले चर्चा झाली, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील खोके सरकार शेख हसीना यांच्या प्रमाणं पळवून पळवून घालवायचं नाही तर लोकशाही मार्गानं घालवायचं असल्याचं म्हटलं.
संबंधित बातम्या :