50 हजार योजनादुतांची नियुक्ती होणार, सरकार 300 कोटींचा खर्च करणार, प्रत्येकाला किती मिळणार मानधन?
राज्यात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती (50 thousand planners be appointed) करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा (Government scheme) प्रचार करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे.
Maharashtra Govt News : राज्यात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती (50 thousand planners be appointed) करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा (Government scheme) प्रचार करण्यासाठी या योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, या नियुक्त्या सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. प्रत्येकाला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.
18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका योजनादुताची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येच्या मागे एक योजनादूत अशा प्रकारे 50 हजार योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कशी असणार निवड प्रक्रिया?
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून "मुख्यमंत्री योजनादूत" (Mukhyamantri Yojana Doot) कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे. दरम्यान, यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात सदरील उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्याप निश्चित झाली नाही. प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी 1 नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या: