एक्स्प्लोर

अजित पवारांच्या 'जनसन्मान' यात्रेनंतर आता शरद पवार गटाकडून 'शिवस्वराज्य' यात्रेचे आयोजन, विधानसभेसाठी कसली कंबर!

अजित पवार यांच्या राष्ट्रवादने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. त्यानंतर आता शरद पवार यांच्याकडून शिवसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत. त्यांच्या या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आसून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा या यात्रेत सहभाग असेल. असे असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही एक यात्रा काढली जाणार आहे. आज (9 ऑगस्ट) या यात्रेचा शुभारंभ होईल. 

शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून यात्रेला सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रे कालच सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू होत आहे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाची यात्रा पार पडेल. 

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जाणार यात्रा

या यात्रेच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता जुन्नरमधील लेण्याद्री येथे पहिली सभा घेण्यात येईल. त्यानंतर आंबेगाव, खेड-आळंदी आणि शेवटची सभा भोसरी विधानसभेत संपन्न होईल. पुढील दहा दिवस ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पोहोचणार आहे. या यात्रेच्या शुभारंभासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सकाळी 9 वाजता शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एकत्र येणार आहेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा

दरम्यान, अजित पवार जनसन्माम यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार आहेत. या यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. यात्रेतील बस, चारचाकी वाहने यांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. या यात्रेचे काम पाहणाऱ्या मॅनेजमेंट टीमनेही गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केलेले आहेत. या यात्रेच्या मदतीने अजित पवार राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यात रणनीतीत ते किती यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा :

मोठी बातमी: अजित पवार जन सन्मान यात्रेतून तडकाफडकी मुंबईत, वर्षा बंगल्यावर मोठ्या घडामोडी

"महाविकास आघाडी सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नक्कल", झारखंड सरकारचे नाव घेत अजित पवार यांची खोचक टीका!

मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार पिता-पुत्र शरद पवारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot : गोपीचंद पडळकर म्हणजे आजच्या काळातले सरसेनापती मल्हारराव होळकर : सदाभाऊ खोत
गोपीचंद पडळकर म्हणजे आजच्या काळातले सरसेनापती मल्हारराव होळकर : सदाभाऊ खोत
Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? पटेल आणि तटकरेंचा 'तो' ऑडिओ कुणी ऐकला? रोहित पवारांच्या दिलखुलास गप्पा
बारामतीचा पुढचा दादा कोण? पटेल आणि तटकरेंचा 'तो' ऑडिओ कुणी ऐकला? रोहित पवारांच्या दिलखुलास गप्पा
Ganesh Naik : देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला; गणेश नाईकांचं खळबळजनक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला; गणेश नाईकांचं खळबळजनक वक्तव्य
Gulabrao Patil : राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्यांनी शरद पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार केली? गुलाबराव पाटील प्रश्न ऐकताच सावध, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्यांनी शरद पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार केली? गुलाबराव पाटील प्रश्न ऐकताच सावध, म्हणाले....

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
Embed widget