Sanjay Raut vs Rahul Narvekar: ही तर विधीमंडळाची बेईमानी, संजय राऊत पुन्हा राहुल नार्वेकरांवर बरसले
"विधीमंडळातील किंवा संसदेतील आमदार खासदार पक्ष सोडून गेले ,परंतु पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही. खंडपीठाचे हे निर्देश आहेत. त्यामुळे शिवसेना हा एक संघ आहे आणि एकसंघ राहील", असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) काय होईल यावर मी आज भाष्य करणार नाही.पण सत्य आणि न्याय याचा विजय होईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधिमंडळातील फूट म्हणजे पक्षातील फूट नाही, हे कोर्टाने स्पष्ट सांगितले असल्यावर, याविषयी कुठल्या प्रकारचा संभ्रम असल्याचे कारण नाही, असं शिवसेना (Shiv Sena) खासदार (Maharashtra Political crisis) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. मुंबईतील (Mumbai) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे आमदार अपात्रतेबाबत वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप करत शिवसेनेने (Shiv Sena MLA disqualification case ) याचिका दाखल केली आहे. या दोन्ही प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. "विधीमंडळातील किंवा संसदेतील आमदार खासदार पक्ष सोडून गेले ,परंतु पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही. खंडपीठाचे हे निर्देश आहेत. त्यामुळे शिवसेना हा एक संघ आहे आणि एकसंघ राहील", असं संजय राऊत म्हणाले.
विधीमंडळाची बेईमानी (Sanjay Raut on Rahul Narvekar )
आमदार अपात्रतेसंदर्भात जो वेळ काढू पणा काढला आहे. ही विधिमंडळाची बेईमानी आहे.घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावर बसलेले अध्यक्ष चालवतायेत का? किंवा चालू देता येतं का हा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं म्हणत राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्ला चढवला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घणाघात (Sanjay Raut attacks on Radhakrishan Vikhe)
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे अनेक घोटाळे आहेत. त्याबद्दल मी बोललेलो आहे.भाजप आमदार राहुल कुल यांचा 500 कोटींचा घोटाळा आहे, विखे पाटील यांचा 200 कोटींचा घोटाळा आहे. सरकारसोबत असलेल्या अनेक साखर सम्राटांचे हजार कोटींचे घोटाळे आहेत, जरंडेश्वरवरचादेखील घोटाळा आहे. हे सर्व संचालक मंडळ मला दोन दिवसात भेटायला येत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
घोटाळ्यातून सुटका होण्यासाठी पक्षांतर
या सगळ्या घोटाळ्यांना पाठबळ मिळावं, यातून सुटका व्हावी म्हणून या सगळ्यांनी पक्षांतर केले.2024 लांब नाही.केंद्रात आणि महाराष्ट्रात नक्की बदल होतील .मग पाहा तुम्ही काय होतंय, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
सनातन धर्म, रामदेव बाबांवर भाष्य
संजय राऊत यांनी सनातन धर्म आणि रामदेव बाबांवरही भाष्य केलं. "आमची भूमिका आम्ही 'सामना'मध्ये स्पष्ट केली आहे. मोक्षाचा मार्ग कुठून आहे?तो तामिळनाडूमधील भूमी मधूनच आहे, हे आम्ही उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. चाळीस हजार मंदिरं जी तामिळनाडूच्या भूमीत आहेत, त्या तामिळनाडूतून कोणी हिंदू धर्मावर काहीही बोलतं, त्याच्यावर सनातन धर्माची ध्वजा फडकते आहे. बाबा रामदेव यांना ते समजलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
Video : Sanjay Raut vs Rahul Narvekar
संबंधित बातम्या
Ujjwal Nikam : ठाकरे की शिंदे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाच्या बाजूने? उज्ज्वल निकम यांनी सविस्तर सांगितलं!
Maharashtra Political Crisis Live: उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टात सर्वात मोठी सुनावणी