एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार

Sanjay Raut on Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली.

Sanjay Raut : बीड येथील गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेला  खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचे समजते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या सगळ्याच माफियांना अभय आहे. सगळ्याच माफियांना राजकीय आशीर्वाद आहे. जे पक्ष सरकार आहेत, त्यातील अनेक मंत्री माफिया आणि खंडणीखोरांशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावर दबाव आहे, आक्रोश आहे. पण अजित पवार यांच्यात हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचीही हिंमत नाही. 

जातीय व्होट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न

कारण संतोष देशमुख यांचा खून, सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हे फार मोठे षडयंत्र आणि कारस्थान होतं. त्यामध्ये नक्की काय आहे हे सांगण्यापेक्षा आपली जातीय व्होट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. तो निषेधार्ह आहे. धनंजय मुंडे यांच्या लोकांनी ज्यांचे खून केले हे त्यांच्याच समाजाचे आहेत. बीड भागातले 90 टक्के खून हे त्यांच्यात समाजाचे आहेत. या जात आणू नका, अपराधी हा अपराधीच असतो, अपराध्याला जात आणि धर्म नसतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. 

पापाचे प्रायश्चित्त म्हणून दहा लाख रुपये देतात

तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी सरकारने दिलेली मदत नाकारली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, तुम्ही खून करायचे आणि खुनाची किंमत मोजायची हा काय प्रकार आहे? त्यांचा खून हा पोलीस कस्टडीत झाला. हा कोठाडीतला खून आहे. ज्यांनी खून केले त्यांचे समर्थन तुम्ही विधानसभेत केले आणि त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून दहा लाख रुपये देतात, याचा धिक्कार व्हायला पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. 

आणखी वाचा 

Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Embed widget