एक्स्प्लोर

Sanjay Gaikwad: आमदार निवासात शिळं जेवण दिल्यानं टॉवेलमध्येच कॅन्टिनमध्ये आले, कर्मचाऱ्याला धू धू धुतलं; संजय गायकवाड म्हणतात...

Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आमदार कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

Sanjay Gaikwad मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला.  आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या दरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

आकाशवाणी आमदार वसतिगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचंही यावेळी दिसून आलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला. डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितलं, त्याचबरोबर बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

काल (8 जुलै) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली.

कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर संजय गायकवाड काय म्हणाले?

आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवलं होतं. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. 

संबंधित बातमी:

Sanjay Gaikawad Amdar Niwas: आमदार निवासात संजय गायकवाडांना शिळं जेवण दिलं, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन डोक्यावर घेतलं

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Rohini Khadse : 'सरकारचा दुटप्पीपणा, आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले'; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा आकडेवारी देत सरकारवर हल्लाबोल
'सरकारचा दुटप्पीपणा, आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले'; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा आकडेवारी देत सरकारवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Benjamin Netanyahu: इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
देवेंद्र फडणवीसांनी स्टे देऊनही महापौर रितू तावडेंनी BMCच्या इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश दिला, प्रशासनात संभ्रमाचे वातावरण
देवेंद्र फडणवीसांनी स्टे देऊनही महापौर रितू तावडेंनी BMCच्या इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश दिला, प्रशासनात संभ्रमाचे वातावरण
Iran War Live Update: तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव
घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव
Gas Shortage Thane: मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
Shivam Dubey Travel In Train: छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Embed widget