एक्स्प्लोर

विशाल पाटलांना मोठा धक्का! सांगली लोकसभेच्या आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, महेश खराडेंना उमेदवारी जाहीर

Swabhimani Shetkari Sanghatana: . आमचा उमेदवार  फाटका माणूस आणि गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ही निवडणूक 'एक व्होट एक नोट' या तत्त्वावर लढवली जाणार असल्याचे शेट्टीने जाहीर केले आहे.

सांगली :  सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana)  राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडेंना (Mahesh Kharad)  उमेदवारी  जाहीर केली आहे. त्यामुले अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटलांना (Vishal Patil)  हा धक्का मानला जातोय. विशाल पाटलांनी 2019 ला स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच  उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाही आहे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले,   गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊस आंदोलन झाले तेव्हा जवळपास 500 किमी पदयात्रा काढली. 20 ते 22 दिवस ही पदयात्रा सुरू होती. तासगाव कारखाना, डोंगराई कारखाना, नागेवाडी कारखाना यांनी थकवलेली ऊसबिले ती शेतकऱ्यांना आंदोलन करून मिळवून दिली होती. बेदाण्यांचा प्रश्न मार्गी लावला. बेदाणा जो उधळला जातो किंवा पैसे बुडवला जातो त्यावरिधोत आवाज  उठवला. गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष तसेच कणखर नेता म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केला आहे. शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने ही जागा लढवली होती. जवळपास साडे तीन लाख मते मिळवली होती. यावेळी यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील असा विश्वास आहे. 

आमचा उमेदवार  फाटका माणूस आणि गरीब शेतकरी : राजू शेट्टी 

सांगलीत  अपक्ष उभा राहताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यातील ताकदीची आपल्याला मदत होईल अशी विशाल पाटील यांची अपेक्षा होती. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच  उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत  विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाही. आमचा उमेदवार  फाटका माणूस आणि गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ही निवडणूक 'एक व्होट एक नोट' या तत्त्वावर लढवली जाणार असल्याचे शेट्टीने जाहीर केले आहे.

शेतकरी संघटनेचा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला पक्षांपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्‍वाचे आहेत. महायुती असो अथवा महाआघाडी ज्या ज्या वेळी या पक्षांनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्यावेळी कोणताही विचार न करता आम्ही बाहेर पडलो. 

हे ही वाचा :

एकजण डोक्यानं अन् एकजण मातीतली कुस्ती करणार; भाजपचे उमेदवार संजयकाकांचा चंद्रहार आणि विशाल पाटलांना टोला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? ठाकरेंची शिवसेना-काँग्रेसबद्दल मोठी अपडेट समोर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? काँग्रेस- ठाकरेंच्या सेनेबद्दल अपडेट समोर
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
Sharad Pawar and PM Modi: मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?

व्हिडीओ

Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? ठाकरेंची शिवसेना-काँग्रेसबद्दल मोठी अपडेट समोर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? काँग्रेस- ठाकरेंच्या सेनेबद्दल अपडेट समोर
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
Sharad Pawar and PM Modi: मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, भाजपचा महापौर, विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात हादरे बसणार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Embed widget