एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य पक्ष विधानसभा लढणार हे निश्चित, आमचे आणि मनोज जरांगेंचे ध्येय एकच : संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje Chhatrapati, सोलापूर: "स्वराज्य पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार  निश्चित आहे. आमचे आणि मनोज जरांगे दोघांचेही ध्येय एकच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या मागण्या सारख्या आहेत. त्यांचं आणि सरकारचं बोलणं झालंय."

Sambhajiraje Chhatrapati, सोलापूर: "स्वराज्य पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार  निश्चित आहे. आमचे आणि मनोज जरांगे दोघांचेही ध्येय एकच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या मागण्या सारख्या आहेत. त्यांचं आणि सरकारचं बोलणं झालंय. त्यांनी 10 टक्के आरक्षण दिलेलं टिकणार कसं? हा प्रश्न आहे. आज एकंदरीत चर्चा चांगली झाली. मनोज जरांगे शेतकरी आहेत, आम्ही नावालाच शेतकरी आहेत. खऱ्या अर्थाने तेच शेतकरी आहेत. त्यांच्यसोबत माझी चांगली चर्चा झाली. आम्ही तीन तास एकत्रित बसलो" असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून चालणार नाही

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून चालणार नाही. मनोज जरांगे मला बऱ्यापैकी समजले होते ते आणखी समजले. मी त्यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं. जीन्यावरुन जात असताना हात-पाय थरतात. हे चालणार नाही. तब्येत व्यवस्थित असली तर आपण जीवनात काहीही करु शकतो. त्यांची तब्येत बिघडलेली कधीही चालणार नाही. 

छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमधून उभा राहिले, त्यावेळी स्वत: स्वराज्य उभं राहणार होते

पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमधून उभा राहिले. त्यावेळी स्वत: स्वराज्य उभं राहणार होते. माझे वडील आल्यानंतर माझा विषय संपला. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो. प्रामाणिकपणाने प्रचार केला, माझ्याइतका प्रचार केला. आता या दोन वेगळ्या भूमिका आहेत. वडिलांचा पक्ष वेगळा असेल मात्र माझी भूमिका वेगळी आहे. काँग्रेसमध्ये मी मिसफिट आहे. मी मोठा नाही छत्रपती घराणे मोठे आहे, त्याचा मनोज जरांगे सन्मान करतात. विधानसभेत जायचं हे निश्चित आहे. 

सर्व पक्षांनी क्लिअर करायला पाहिजे ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात. पूर्वीच आरक्षण मिळायला पाहिजे होतं. आज का मिळत नाही? सर्वजण म्हणतात आरक्षण द्यायचं. पण आरक्षण टिकणार का? आमच्यासोबत सगळे चांगले लोक येतील. मला वाटलं गरीब मराठा समाजासाठी लढा देतो, त्यांच्याकडे येतो. मला चार दिवस उपोषण केल्यानंतर कधी जाऊन मटण खाऊ असं झालं होतं. ही व्यक्ती 17 दिवस आमरण उपोषण करते. राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. आमची भेट होईल, आणखी काही भेट झालेली नाही, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget