एक्स्प्लोर

Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!

Rohit Pawar on Sharad Pawar & Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. आता यावर रोहित पवारांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.

Rohit Pawar on Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यानंतर पवार कुटुंबात दुरावा वाढल्याचे दिसून आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंब पहिल्यांदाच आमनेसामने आल्याचे दिसून आले. मात्र, मागील महिन्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच गुरुवारी (दि. 23) पुण्यातील एका कार्यक्रमात काका-पुतणे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावरून शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

आमदार रोहित पवार हे आज गुरुवारी (दि. 23) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांना अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कुटूंब म्हणून एकत्र आले पाहिजे हे वाटते. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येणे अवघड आहे. एका पक्षाला विचार सोडावे लागतील तर दोन्ही पक्ष एकत्र होतील. पवार साहेब एक विचार घेऊन पुढे जात आहेत. पण अजित दादा आणि शरद पवार दोन्ही मोठे नेते आहेत, ते याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं?

दरम्यान, आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून आलं. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्यानुसार अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, त्यांच्या जागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ajit Pawar: 'तो' निर्णय शरद पवार घेतील, अजितदादांचं पुण्यातील कार्यक्रमात वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar: पुण्यातील कार्यक्रमातील अजित पवारांची ती मागणी शरद पवारांनी केली मान्य; नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हानPune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीतWalmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...Ajit Pawar Sharad Pawar :शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजित पवार यांनी मंचावरील नेम प्लेट बदलली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Numerology: प्रेमात ईमानदारी, 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या रक्तातच धोका नाही! मात्र लवकर समाधानी नसतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
प्रेमात ईमानदारी, 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या रक्तातच धोका नाही! मात्र लवकर समाधानी नसतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Embed widget