एक्स्प्लोर

Sharad Pawar: पुण्यातील कार्यक्रमातील अजित पवारांची ती मागणी शरद पवारांनी केली मान्य; नेमकं काय घडलं?

Sharad pawar on Ajit Pawar Demand: उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते‌ ती वाढवावी असं अजित पवारांनी म्हटलं होतं ती मागणी शरद पवारांनी त्याच कार्यक्रमामध्ये मान्य केली आहे.

पुणे: आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पार पडली आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना, कारखान्याच्या चालकांना आणि संबधितांना काही अडचण आल्यास मला संपर्क साधा. त्याचबरोबर संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी संस्था आणि सरकारमध्ये व्यवस्थित समन्वय असण्याची गरज आहे, असं म्हणत मदतीची ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी यावेळी बोलताना शरद पवारांकडे (Sharad Pawar) एक मागणी केली होती. उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते‌ ती वाढवावी असं अजित पवारांनी म्हटलं होतं ती मागणी शरद पवारांनी त्याच कार्यक्रमामध्ये मान्य केली आहे.

अजित पवारांची मागणी काय? 

कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते‌. आज दहा हजारला फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ती रक्कम एक लाख रुपये करण्याची मी विनंती करतो. अर्थात वाढ कधी करायची याचा निर्णय शरद पवार घेतील, अशी मागणी यावेळी अजित पवारांनी यावेळी केली आहे. ही मागणी शरद पवारांनी मान्य केली आहे, त्यांनी अजित पवारांच्या भाषणानंतर त्यांच्या भाषणात याबाबतची वाढ केल्याची माहिती दिली. 

शरद पवार काय म्हणाले?

आतापर्यंत वैयक्तीक कामगिरीबद्दल संस्थेकडून दिले जाणारे पुरस्कार दहा हजार रुपयांचे होते. आजपासून त्यांची रक्कम वाढवून एक लाख रूपये असेल. अंबालिका साखर कारखान्याला देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम दोन लाख होती ती आता पाच लाख रूपये असेल. अजित पवारांनी भाषणात वैयक्तिक पुरस्कारांची रक्कम दहा हजार वरून वाढवून एक लाख करण्याची मागणी केली होती. शरद पवारांनी ही मागणी लगेच मान्य केली. त्याचबरोबर अजित पवारांच्या अंबालिका या खाजगी कारखान्याला बक्षीसाची रक्कम वाढवून दोन लाखांवरुन पाच लाख रुपये देण्यात येईल असे जाहीर केले आहे. 

अजितदादा शरद पवारांच्या शेजारी बसणार होते, पण...

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, आता त्यांच्या जागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले आहेत. बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये देखील हे दोन्ही एकत्रित एकाच व्यासपिठावरती आले होते. मात्र, त्यावेळी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांना इग्नोर केल्याचं पाहायला मिळालं होतं. आज देखील या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या बाजुला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Embed widget