(Source: Poll of Polls)
Rohit Pawar : हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं; महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला चार जागा? रोहित पवार यांचं खोचक ट्वीट
Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला चार जागा येणार असल्याची सध्या चर्चा आहे. यावर रोहित पवार यांनी खोचक ट्वीट केलं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जागावाटपाबाबत चर्चा आणि बैठका सुरु आहे. महायुतीमध्ये जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. काही जागांवर महायुतीत संभ्रम कायम असल्याचं दिसत आहे. दोन दिवसात महायुतीकडून जागावाटपासह सर्व उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला चार जागा येणार असल्याची सध्या चर्चा आहे. यावर रोहित पवार यांनी खोचक ट्वीट केलं आहे.
28 मार्चला महायुतीच्या जागावाटपाची घोषणा
28 मार्चला उमेदवार आणि जागांची नावे स्पष्ट करण्यात येतील, अशी माहिती बुधवारी अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महायुतीकडून 28 मार्चला संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार असून यावेळी जागावाटपात निर्णय स्पष्ट करण्यात येईल. स्टार प्रचारकांची यादीही जाहीर करण्यात येईल. आम्ही भरपूर जागा मागण्याचा प्रयत्व केला. कार्यकर्त्यांचं समाधान होईल अशा जागा महायुतीकडून मागितल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. 28 मार्चला महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवारी नावे जाहीर करण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
रोहित पवार यांचं खोचक ट्वीट (Rohit Pawar Tweet on Mahayuti Seat Sharing)
महायुतीतील जागावाटपावरून रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी एक्स मीडियावर खोचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, एरवी रुबाबदारपणे तिकिटं वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढं करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय. आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील.
रोहित पवार यांचं खोचक ट्वीट
एरवी रुबाबदारपणे तिकिटं वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढं करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 26, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :