एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचा अजित दादांना 'जोर का झटका'; दादांच्या संपर्कात असणारा माजी नगरसेवक मशाल पेटवणार

Maha Vikas Aghadi vs Mahayuti: गेल्या दोन वर्षांपासून अजित पवारांच्या संपर्कात असलेले पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Uddhav Thackeray vs Ajit Pawar : पिंपरी-चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहे. एवढंच काय तर, आयाराम गयारामांची ये-जा देखील सुरू आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर यंदाची पहिलीच विधानसभा असल्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यात काही शंकाच नाही. अद्याप निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीदेखील संपूर्ण साम, दाम, दंड भेद वापरुन विरोधकांना मात देण्यासाठी सर्वांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अजित पवारांना ठाकरेंनी जोर का झटका दिल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अजित पवारांच्या संपर्कात असलेले पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

महायुतीला (Mahayuti) पाठींबा देत, सत्तेत सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election 2024) पुणे, पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. अशातच आपली ताकद वाढवण्यासाठी अजित दादा गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नात होते. पण, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे (Ravi Landge) आज अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडून उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत. 

उद्धव ठाकरे आज अजित पवारांना पुन्हा एकदा जोर का धक्का देणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे आज ठाकरेंची मशाल पेटवणार आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करत रवी लांडगे मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते हाती शिवबंधन बांधणार आहेत. 

साधारणतः दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यापासून लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. लोकसभेत ही लांडगेंनी घड्याळाचा दणक्यात प्रचार केला. मात्र, भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या रवी लांडगेंना महायुतीतून तिकीट मिळणार नाही हे उघड आहे. म्हणूनचं रवी लांडगेंनी महाविकासआघाडीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी आधीचं शरद पवार गटात प्रवेश करत, तुतारीसाठी दावा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल, ही शक्यता गृहीत धरून रवी लांडगे मशाल हाती घेण्यासाठी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लांडगेंचा प्रवेश होणार आहे.

कोण आहेत रवी लांडगे?

माजी विरोधी पक्ष नेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव, तसेच, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे म्हणजे, रवी लांडगे. भाजप युवा मोर्चाचं शहराध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. 2017 च्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे बिनविरोध निवडून आलेले एकमेव नगरसेवक होते. गेल्या अनेक वर्षांपासून रवी लांडगे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. तसे, वेळोवेळी त्यांचे प्रयत्न पाहायलाही मिळाले आहेत. 

दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर रवी लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. मात्र, भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या रवी लांडगे यांनी अखेर अजित दादांची साथ सोडून महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभेच्या तिकीटासाठी त्यांनी ठाकरेंच्या मशालीची निवड केल्याचं कळतंय. तसेच, आज त्यांचा पक्षप्रवेशही होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!Zero hour | Kunal Kamraच्या विनोदानंतर वादंग, विधिमंडळात पडसाद,शिवसेनेचा कामराच्या वक्तव्यावर आक्षेप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget