Ratnagiri Vidhansaha Election : रत्नागिरीत बदल हवा! मंत्री उदय सामंतांविरोधात भाजपचे माजी आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत?
Ratnagiri Vidhansaha Election : मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात भाजपचे माजी आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
Ratnagiri Vidhansaha Election : विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर आता सर्वच पक्ष, महायुती आणि आघाडीत इच्छुकांचे दावे वाढू लागले आहेत. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी - संगमेश्वर हा विधानसभा मतदारसंघ देखील आशाच गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार असलेले सुरेंद्र उर्फ बाळा माने यांनी थेट बंडाचं निशाण फडकावलं आहे का? अशी चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत घेतलेली भूमिका. रत्नागिरीमध्ये बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेत रत्नागिरीतील लोकांना बदल हवा. सध्या आपल्याच गोष्टी पुढे केल्या जात आहेत. मी म्हणेन ते धोरण आणि बांधेन ते तोरण अशी भूमिका घेतली जात असल्याचं म्हणत माने यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीत असल्यानंतर देखील माने यांनी घेतलेली भूमिका ही आपल्याच मित्रपक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधीविरोधात असल्याचं स्पष्ट झालं आहे. माने यांच्या या भूमिकेवरून रत्नागिरीमध्ये महायुतीत स्थानिक पातळीवर सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. माने यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी नव्हते. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका काय? याची देखील चर्चा एका बाजुला होत आहे. बाळ माने यांचा 2004 मध्ये पहिल्यांदा उदय सामंत यांनी पराभव केला होता.
बाळ माने अपक्ष की ठाकरे गटात?
दरम्यान, बाळ माने यांच्या भूमिकेबाबत विविध चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहेत. माने यांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झालेला असताना तो लांबला का? त्यामागील कारण काय? तो कुणी रोखला की पक्षांतर्गत त्याला विरोध झाला? अशा चर्चा देखील रंगल्या. त्याचवेळी दुसरीकडे बंडखोरी करून बाळ माने हे अपक्ष लढणार का? अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. यावेळी माने यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी नेमकी काय भूमिका? घेणार हे देखील पाहावं लागेल.
ठाकरेंकडून दोघे इच्छुक?
उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत दोघेजण इच्छुक आहेत. त्यामध्ये उदय बने आणि राजेंद्र महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय, निष्ठावंताला उमेदवारी द्या असा काहीसा सूर देखील सध्या पक्षात दिसून येत आहे. परिणामी उदय सामंत यांच्याविरोधात कोण? याची उत्सुकता सध्या रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या