एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sandeep Naik : शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का, गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

Sandeep Naik will joins Sharad Pawar NCP : संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित

Sandeep Naik will joins Sharad Pawar NCP, मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) जोरदार इनकमिंग सुरु आहे. गेल्या चार महिन्यांत दोन डझन पेक्षा जास्त दिग्गज नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) आणि भाजपचे नेते गळाला लावून पुन्हा एकदा विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. दरम्यान, शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का दिलाय. 

मुंबईतील भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जातोय. नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.21) संदीप नाईक यांचा प्रवेश पार पडणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक (Ganesh Naik) महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार तर संदीप नाईक (Sandeep Naik) बेलापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असेही बोलले जात आहे.

गणेश नाईक 2019 पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी होते 

एकेकाळी गणेश नाईक यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. ते बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यानंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले होते. शरद पवारांचे समर्थक म्हणूनही त्यांनी ओळखन निर्माण केली होती. दरम्यान 2019 मध्ये राज्यात भाजपची लाट असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान आता त्यांचे पुत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत. 

ज्योती मेटेंनीही तुतारी फुंकली

दिवंगत नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे  शरद पवार पक्षासोबत चर्चा केली होती. आता विधानसभेवेळी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला, विधानसभेमध्ये त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Vidhansabha Election : अजितदादांविरोधात बारामतीचा उमेदवार ठरला, वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर

Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget