एक्स्प्लोर

Ramdas Kadam Exclusive VIDEO : विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सगळ्या जागांवर लढणार; रामदास कदमांचा भाजपला इशारा

Ramdas Kadam Exclusive : जागावाटपावेळी जे काही झालं ते अतिशय घृणास्पद झालं, अतिशय विश्वासाने आम्ही भाजपसोबत गेलो होतो असं शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले. 

मुंबई: अजितदादांना जरा उशिरा घेतलं असतं तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं शिवसेनेला मिळाली असती आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेल्यांना जॅकेट घालून बसावं लागलं नसतं असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटलंय. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, पण भाजपचेही उमेदवार पडलेच की, त्यामुळे सर्व्हे फक्त शिवसेनेचे उमेदवार बदलण्यासाठीच होते की काय असा सवालही त्यांनी विचारला. विधानसभेच्या निवडणुकीत जर सेनेला 100 जागा दिल्या नाहीत तर सर्वच जागा आमच्या असं म्हणत त्यांनी भाजपला इशाराच दिला. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. 

काय म्हणाले रामदास कदम? 

जागावाटपावेळी जे झालं ते अतिशय घृणास्पद झालं. रायगड आमचं, रत्नागिरी आमचं, अमरावती आमचीच असं सगळं भाजपने केलं. अतिशय विश्वासाने आम्ही भाजपसोबत गेलो होतो. जर एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या.

अमरावतीची जागा आमच्याकडून घेतली. त्या ठिकाणी अडसूळ आधी पडले होते ते ठीक. पण मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनवेळा खासदार असतानाही ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. त्यामुळे हा प्रकार पुन्हा न होता विधानसभेला आम्हाला 100 जागा द्या, म्हणजे आधी काम करता येईल.

सर्व्हेच्या नावाखाली उमेदवार बदलले 

भाजपला देखील सर्व्हेचं प्रकरण पटलं नसावं. फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्व्हे पुढे केला का असा प्रश्न पडतो. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. पण भाजपच्याही जागा पडल्या, त्यावर काय म्हणायचं? भावना गवळी, हेमंत गोडसे नको असं भाजपचं मत होतं. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का? तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतले का? 

अजित पवार यांची प्रशासनावर पकड चांगली आहे, ते चांगलं काम करतात. माझं म्हणणं एवढंच होतं की, त्यांना महायुतीत घ्यायला थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती. एकनाथ शिंदेंनी ज्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, ते बिचारे जॅकेट घालून बसले नसते. 9 मंत्रिपदं मिळाली असती तर त्यामुळे शिवसेनेची बांधणी अधिक भक्कम झाली असती. 

महायुतीचा लोकसभेत पराभव का झाला याचं विश्लेषण तीनही पक्षांनी करावं असं रामदास कदम म्हणाले.

शिवसेनेला 100 जागा हव्यात

शिवसेनेला येत्या विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा हव्यात असं सांगताना रामदास कदम म्हणाले की, आमच्याकडे आता 50 आमदार आहेत. गेल्या वेळी आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला 100 जागा हव्यात. त्या दिल्या नाहीत तर सगळ्या जागा आमच्याच. भाऊ भाऊ म्हणता मग वाटून खाऊ. 

उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या, मग आम्हाला कमी का मिळाल्या. आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर आणखी खासदार निवडून आले असते. तुलाही नाही आणि मलाही नाही असं व्हायला नको. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला सत्ता आणायची आहे. 

ही बातमी वाचा : 

महत्त्वाच्या बातम्या

Beed : 'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
Ishwarpur : जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल
जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget