Ramdas Athawale : महायुतीत मला लोकसभेसाठी एकही जागा मिळाली नाही, रामदास आठवलेंनी माझा कट्ट्यावर मांडली मनातील खदखद
Ramdas Athawale Majha Katta : महायुतीत एकही जागा न मिळाल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) मनातली खदखद मांडली आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महायुतीतून (Mahayuti Seat Sharing) मला एकही जागा मिळाली नाही, शिर्डीतून (Shirdi) जागेचा आग्रह होता, मात्र तसं काही झालं नाही असं म्हणत आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) मनातली खदखद मांडली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा' यामध्ये खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लोकसभेसाठी आरपीआयला उमेदवारी मिळाली नसतानाही महायुतीसोबत राहण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह
आठवले यांनी पुढे सांगितलं की, मी शिर्डीतून उभं राहावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण महायुतीतून मला एकही जागा मिळाली नाही. र्शिडी मतदारसंघासाठी आठवलेंची मागणी होती. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शिर्डीच्या जागेबद्दल बोलणं झालं होतं. अमित शाहांना पत्र लिहिलं होतं. जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीसांनाही पत्र लिहिलं होतं. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की चर्चेमध्ये तुमचं नाव आलेलं नाही. फडणवीसांनी माझ्यासोबत चर्चा केली असती आणि सोलापूर किंवा ईशान्य मुंबईच्या जागेबाबत चर्चा केली असती, तर आमच्या दलितांची मते मला मिळाली असली, पण अशी चर्चा झाली नाही.
महायुतीसोबत राहण्याचं कारण सांगितलं
दरम्यान, महायुतीकडून उमेदवारी मिळाली नसतानाही मोदी सरकारला पाठींबा देण्यामागचं कारण सांगताना आठवले म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांसोबत सुमारे एक तास चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की, शिर्डीतून उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केला. पण, एकनाथ शिंदे यांनी आग्रह केला की, त्यांच्यासोबतच्या खासदारांना संधी देण्याची आवश्यकता आहे, सदाशिव लोखंडे आमचे मित्र आहेत. पण, मला कॅबिनेट मंत्री पद देण्याचं आश्वासन दिलं असून एखादं राज्य मंत्री पदही आमच्या वाट्याला येईल, असं फडणवीसांनी सांगितल्याचा दावा आठवलेंनी माझा कट्ट्यावर केला आहे.
देशासाठी एकत्र आलं पाहिजे
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. ते निवडून आल्यावर संविधान बदलणार नाहीत. राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा काढत आहे, तुमच्या कार्यकाळात तुम्ही भारत का जोडला नाही. त्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे. भारत कुणी तोडू शकत नाही, छोटे-मोठे वाद होतात. आंबेडकरांची भूमिका होती की, देशासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे.
मोदीजी करणार 400 पार, मग का होणार नाही इंडिया आघाडीची हार
महाविकास आघाडीचे नेते सांगतात की, मोदी संविधान बदलणआर. 400 पार झाले की, मोदी संविधान बदणार, पण असं काहीही होणार नाही. 'मोदीजी करणार 400 पार, मग का होणार नाही इंडिया आघाडीची हार', असं म्हणत आठवलेंनी शेरोशायरी करत इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हीच होती की, देशासाठी, अखंड भारतासाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे, देशासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो पाहिजे, त्यामुळे मोदींचं नेतृत्वाला पाठिंबा असल्याचं आठवले म्हणाले.
पाहा व्हिडीओ : रामदास आठवलेंचा खळखळून हसवणारा 'माझा' कट्टा
महत्त्वाच्या इतर बातम्या :