Ramdas Athawale : भारत तोडणारे, आता भारत जोडायला निघालेत; रामदास आठवलेंचा राहुल गांधींवर निशाणा
Ramdas Athawale on Rahul Gandhi : भारताला तोडणारे आता भारत जोडायला निघालेत, असं म्हणत रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर आणि राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं आहे.
Ramdas Athawale on Majha Katta : रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी माझा कट्ट्यावरून (Majha Katta) इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) जोरदार निशाणा साधला आहे. इंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती, त्यांच्या काळात ती पूर्ण झाली नाही. आता मात्र लोकांची दिशीभूल करणं, लोकांमध्ये फूट पाडणं आणि भारत तोडोचं काम करणारे, आता काय भारत जोडणार आहेत. मला जागा जरी मिळाली नसली तरी, मी महायुतीसोबत आहे, असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.
भारताला तोडणारे आता भारत जोडायला निघालेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. देश प्रगती करताना दिसत आहे. अर्थव्यवस्था सुधारत आहे. इंडिया आघाडीचे लोक म्हणतात मोदी निवडून आल्यावर देशाचं संविधान बदलणार, पण मोदी असं करणार नाहीत. देश कुणी तोडू शकत नाहीत. राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा काढत आहे, तुमच्या कार्यकाळात तुम्ही भारत का जोडला नाही. त्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे. भारत कुणी तोडू शकत नाही, छोटे-मोठे वाद होतात. आंबेडकरांची भूमिका होती की, देशासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे.
सत्ता असो किंवा नसो कार्यकर्ते कायम माझ्यासोबत
रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं की, देश सध्या प्रगती करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पना रिझर्व्ह बँकेची मांडली होती. 1 एप्रिल रोजी स्थापन झालेल्या आरबीआयला आज 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी लोकसभेतील माणूस आहे. 1998 मध्ये मुंबईत निवडून आलो होतो. 1999 आणि 2004 मध्ये शिर्डीत निवडून आलो होतो. चौथ्या वेळी निवडणुकीत मी पडलो, मला पाडण्यात आलं. माझ्या पराभवाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं साथ दिली नाही. सत्तेत असलो, नसलो तरी कार्यकर्ते कायम सोबत आहेत.
लक्षद्वीपमध्ये RPI पक्षाची स्थापना होणार
संपूर्ण देशात आरपीआय पक्ष वाढला आहे. नागालँड, मेघालय, मिझोराममध्ये आरपीआय पक्ष वाढला आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, दादरा नगर हवेली,अंदमान-निकोबारमध्ये पक्ष वाढलाय. आता लक्षद्वीपला जाऊन आलोय तिथेही आमच्या पक्षाची स्थापना होणार आहे, असं आठवले यांनी माझा कट्ट्यावर सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ : रामदास आठवलेंचा खळखळून हसवणारा 'माझा' कट्टा
महत्त्वाच्या इतर बातम्या :