मनसेमुळे मतांचा फरक पडत नाही, त्यांना सोबत घ्यायची गरज नाही, रामदास आठवलेंची शेलक्या शब्दात टीका
Ramdas Athawale on Raj Thackeray, Pune : गेल्या काही आठवड्यांपासून राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.
Ramdas Athawale on Raj Thackeray, Pune : गेल्या काही आठवड्यांपासून राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. राज ठाकरे यांनी दिल्लीत जात गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसेला किती जागा दिल्या जाणार यावरुन जोरदार चर्चा सुरु आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी 2 जागांची मागणी आम्ही केली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज ठाकरेंच्या महायुतीतील प्रवेशाबाबत भाष्य केलं आहे. मनसेला महायुतीमध्ये घेण्याची गरज नाही, असं रामदार आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या उपस्थितीत पुण्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनसेमुळे मतांचा फरक पडणार नाही
रामदास आठवले म्हणाले (Ramdas Athawale), मनसेला सोबत घ्यायची आवश्यकता नाही. मनसेमुळे मतांचा फरक पडणार नाही. त्यांना घ्यायचंच असेल तर वरचे नेते ठरवतील. आता आम्ही Bjp च्या चिन्हावर लढणार नाही. आमच्या चिन्हावर 2 जागा लढवायच्या आहेत. मनसेमुळे मतांचा फरक पडत नाही, त्यांना सोबत घ्यायची गरज नाही. राज ठाकरेंना सोबत घ्यायचे असेल तर वरचे नेते ठरवतील, असं रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी स्पष्ट केलं.
रामदास आठवलेंकडून 2 जागांची मागणी
महायुतीतील जागा वाटपात आरपीआयला 2 जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी सातत्याने केली आहे. शिवाय, शिर्डीच्या जागेवरुन स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले (Ramdas Athawale) निवडून आले होते. त्यामुळे त्याच मतदारसंघातून पुन्हा एकदा लोकसभा लढवण्याची इच्छा रामदास आठवले यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
मनसेच्या महायुतीमध्ये येण्याने आठवले नाराज?
गेल्या अनेक दिवसांपासून रामदास आठवले (Ramdas Athawale) लोकसभेच्या 2 जागा मिळाव्यात अशी मागणी करत आहेत. मात्र, त्यांच्या मागणीला भाजपकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दुसरीकडे मनसेच्या महायुतीतील प्रवेशासाठी 2 जागांची ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे रामदास आठवले (Ramdas Athawale) नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. महायुतीकडून जागा सुटली नाही तर कोणता निर्णय घ्यायचा? याबाबत आठवले आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या