एक्स्प्लोर

Raj Thackeray : 'वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला', राज ठाकरेंच्या भूमिकेवर नेटकरी काय काय म्हणाले?

Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava Speech : राज ठाकरेंनी मोदींसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा समावेश असलेल्या महायुतीला पाठिंबा तर जाहीर केला, पण त्यामागची कारणमिमांसा मात्र स्पष्ट केल्याचं दिसलं नाही.

मुंबई: राज्याच्या राजकारणात एवढं काही घडत असताना एक कणखर नेतृत्व समजले जाणारे राज ठाकरे काहीतरी ठोस भूमिका घेतील, काहीतरी ठाम भूमिका घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना उर्जा देतील, त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करतील अशी अनेकांना आशा होती. मनसेच्या स्थापनेच्या सुरूवातीच्या वर्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो जोश होता तो पुन्हा निर्माण करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी आपण निवडणूक लढणार नाही, आपल्याला राज्यसभा नको ना विधानपरिषद, आपण नरेंद्र मोदींनी बिनशर्त पाठिंबा देणार (Raj Thackeray Supports Narendra Modi) असं जाहीर केलं आणि बहुतांश कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचं दिसलं. 

राज ठाकरे गुढी पाडव्याच्या मेळाव्यात कुणाला धारेवर धरणार हे ऐकायला महाराष्ट्रभरातून त्यांचे कार्यकर्ते आले होते. पण आपण लोकसभा निवडणूक लढणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यावर सोशल मीडियातून प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला.

नेते म्हणाले, हिंदुत्वासाठी भाजपसोबत जायला अडचण नाही

नेते म्हणत होते की हिंदुत्वासाठी महायुतीसोबत जायला काही हरकत नाही, पण कार्यकर्ते मात्र वेगळाच विचार करत होते. अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी 'एकला चरो रे' अशी भूमिका घ्यावी आणि सत्ताधारी तसेच विरोधकांना अंगावर घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम झाल्याचं दिसलं.

नेटकरी काय म्हणाले? 

राज ठाकरेंच्या नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर सोशल मीडियातून मोठ्या प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये बहुतांश लोकांना राज ठाकरेंची ही भूमिका पटली नसल्याचं सांगितलं. अनेकांनी तर त्यावर मीम्सही तयार केले. त्यापैकी काही कमेंट्स पाहिल्यानंतर लोकांचा कल काय होता ते लक्षात येईल, 

- वसंत मोरेंनी योग्य निर्णय घेतला. 
- अशी भूमिका घ्या की आपलेच कार्यकर्ते नाही तर समोरचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले पाहिजेत. 
- भूमिका अशी घ्या की कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहिजेत.
- फक्त एक ईडीच्या नोटीसने उभा महाराष्ट्र सरळ करणारा माणूस स्वतः सरळ झालाय. 
- यासाठी एवढी मोठी सभा घ्यायची मग गरज होती का? एक ट्विट टाकला असता तरी चालल असत, आणि हे अपेक्षित होतं.
- हे तर एक पत्रक काढून सांगता येत होते.
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, मणिपूर, महागाई, electoral bonds, शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचाऱ्यांना प्रवेश इत्यादीसाठी बिनशर्त पाठिंबा. 

राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं, पण संधी असताना आणि महायुती जागा देत असतानाही लोकसभा निवडणूक का लढली नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फक्त भाजपच्या मोदींसाठी आपण शिवसेना-राष्ट्रवादीचा सहभाग असलेल्या महायुतीला का पाठिंबा देतो हेदेखील फोडून सांगता आलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचंही बोललं जातंय.

त्यामुळे लोकसभा निवडणूक लढणार नाही, फक्त मोदींसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची सेना आणि भाजप असलेल्या महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका नेटकऱ्यांना मात्र पटली नसल्याचं दिसतंय. 

ही बातमी वाचा: 

MNS Sainik Sangli : सांगलीचा मनसैनिक चुकला, म्हणाला, मी चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget