Raj Thackeray-Uddhav Thackeray: ही सुरुवात आहे, आपल्याला खुलं आमंत्रण; राज-उद्धव यांचं दुसरं एकत्र निमंत्रण, दोन्ही पक्षाचे शिलेदार कार्यक्रमास्थळी पोहचले
Raj Thackeray-Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंकडून आज दुसरं एकत्रित विजयी मेळाव्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा (Shivsena UBT-MNS Melava) साजरा करणार आहेत. वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
विजयी जल्लोष मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटातील (Shivsena UBT) नेत्यांकडून वरळी एनएससीआय डोम येथे पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब, आशिष चेंबुरकर, सुनील शिंदे, तर मनसेकडून बाळा नांदगावर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार यांनी वरळीतील एनएससीआयची पाहणी केली.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचं दुसरं एकत्र निमंत्रण-
ठाकरे बंधूंकडून आज दुसरं एकत्रित विजयी मेळाव्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायलं आहे?, मग ही सुरुवात आहे, असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सर्वांना दुसरं जाहीर खुलं आमंत्रण दिलं आहे. 
ठाकरे बंधूंच्या पहिल्या आमंत्रणात काय होतं?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काल पहिलं एकत्रित पत्रक काढत सर्वांना आवाहन केलं. आवाज मराठीचा...असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं..., कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं...आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या...आम्ही वाट बघतोय..., असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावंही देण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2025
यावे
जागराला यावे…
@Dev_Fadnavis
@AmitShah
@narendramodi
@mieknathshinde pic.twitter.com/zWPWPOUB9U
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची A टू Z माहिती-
विजयी मेळावा-
दिनांक- 5 जुलै 2025
ठिकाण- NSCI वरळी डोम, मुंबई
वेळ- सकाळी 10 वाजता























