एक्स्प्लोर

मोठी बातमी : राज ठाकरे-मोदी एकाच मंचावर; मुंबईच्या शिवाजी पार्कात तोफ धडाडणार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा मतदानासाठी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी मुंबईत एकाच मंचावर मुंबई, ठाणे आणि पालघरच्या जनतेला संबोधित करणार आहेत.

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकाच मंचावर येणार आहे. मुंबईच्या (Mumbai) दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) भव्य सभेचं आयोजन (Mahayuti Public Meeting) करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या सभेत जनतेला संबोधित करणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे. यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल.

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी 17 मे रोजी मुंबईत भव्य सभा पार पडणार आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रचाराच्या दृष्टिकोनातून ही सभा खूप खास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावरील भव्य मंचावरून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील जनतेला संबोधित करणार आहेत.

मुंबईच्या शिवाजी पार्कात तोफ धडाडणार

मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते वागीश सारस्वत यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान बुक करण्यात आलं होतं. पण राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महायुतीच्या सर्व लोकसभा उमेदवारांच्या समर्थनार्थ मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होणार आहे.

पंतप्रधान मोदींचा मुंबईमध्ये रोड शो आणि शिवाडी पार्कात भव्य सभा

तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरे यांनी कणकवलीत भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित केलं होतं. आता 10 मे रोजी पुण्यात आणि 12 मे रोजी ठाणे जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील लोकसभेच्या जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी, 17 मे रोजी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा होईल. शिवाजी पार्क मैदानाच्या मंचावरून राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस वागीश सारस्वत यांनी दिली आहे.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget