![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Radhakrishna Vikhe Patil : पुतळ्यावरून राजकारण करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण, विखे पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil, Ahmednagar : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी घटनास्थळी जात पाहणी केली होती.
![Radhakrishna Vikhe Patil : पुतळ्यावरून राजकारण करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण, विखे पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल Radhakrishna Vikhe Patil Politicizing from statues is a sign of intellectual bankruptcy, Vikhe Patil attacks Mahavikas Aghadi Maharashtra Politics Marathi News Radhakrishna Vikhe Patil : पुतळ्यावरून राजकारण करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण, विखे पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/28/809b8444b2c511223cb0df30c2a206151724842701740924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Radhakrishna Vikhe Patil, Ahmednagar : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी घटनास्थळी जात पाहणी केली होती. दरम्यान, आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला. आता याबाबत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. नौदलाकडून पुतळ्यासंदर्भामध्ये निकष पडताळून पाहण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यांना नौदलावरच विश्वास आहे की नाही हा प्रश्न आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. मात्र त्याबाबत केलं जाणार राजकारण हे उचित नसल्याचे देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मविआकडून सरकारचा निषेध केला जातोय याबाबत महसुलमंत्री राधाकृष्ण विखेंना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गणेशोत्सवापर्यंत महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय
नगर-मनमाड महामार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. याबाबत अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी आढावा बैठक घेतली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गणेशोत्सवापर्यंत या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री विखेंनी सांगितले आहे. सोबतच गरज पडल्यास वाहतूक वळण्याची मुदत वाढविण्यात येईल तसेच 15 दिवसात या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली जाईल असं विखे म्हणाले.
नारायण राणे काय काय म्हणाले?
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे. या पुतळ्याचं आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले होते. मात्र, ऐन पावसाळ्यात जोरदार वाऱ्यांमुळे हा पुतळा कोसळला आहे. मी यामध्ये कोणावर दोषारोप करण्याऐवजी हा पुतळा ज्यांनी बांधला त्या टेक्निशियन लोकांची चौकशी व्हावी, अशी मागणी करतोय. कशामुळे हा पुतळा कोसळला, याचे कारण बाहेर यावे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, ही माझी इच्छा असल्याचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Narayan Rane: आमचा इतिहास माहिती नाही का? आम्हाला काही करायचं असतं तर एकही घरापर्यंत पोचू शकला नसता: नारायण राणे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)