Radhakrishna Vikhepatil : शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला, त्यांच्या मांडीवर जाऊन बसता; राधाकृष्ण विखेंचा हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल
Radhakrishna Vikhepatil : राधाकृष्ण विखे पाटलांनी हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
Radhakrishna Vikhepatil, अहमदनगर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत. यावर आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील काय काय म्हणाले?
राष्ट्रवादी शरद पवार पक्षात इनकमिंग वाढलं आहे, हा महायुतीला धक्का आहे का? असे राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, महायुतीला धक्का वैगरे काही नाही. महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा विचार तर महायुतीला करावाच लागेल. हर्षवर्धन पाटील यांची तशीच अडचण झाली होती. त्यांनी तुतारी हाती घेण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैव आहे. स्वर्गीय शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्या सोबत संघर्ष केला. तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसता हे काही योग्य नाही, असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला.
बोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडला
पाथर्डी आणि नगर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडलं. जवळपास 92 कोटी रुपये खर्चून हा वांबोरी चारीचा दुसरा टप्पा होणार आहे. राहुरी विधानसभा निवडणुकीत वांबोरी चारीचा मुद्दा नेहमीच चर्चिला जातो. त्यामुळे या कामाचे भूमिपूजन करून माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे कोंडी केली आहे.
रोहित पवार आता हॉटेलचे बिल देखील पाहत आहेत
दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले पण बिलं उधार ठेवून आलेत. आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या दावोस समिट सारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर केली होती. याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला माहिती नव्हतं की रोहित पवार आता हॉटेलचे बिल देखील पाहत आहेत. मीच त्यांना ही सर्व बिल पाठवून देतो असं म्हणत राधाकृष्ण विखेंनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या