एक्स्प्लोर

Muralidhar Mohol Meet Amit Shah: अखेर अमित शाह अन् मुरलीधर मोहोळ यांची भेट; रात्री 1.20 वाजता मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

Muralidhar Mohol Meet Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुरलीधर मोहोळ यांची मुंबईत भेट झाली.

Muralidhar Mohol Meet Amit Shah: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट (Pune Jain Boarding) बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या व्यवहारावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे दिसून आले. मात्र रविंद्र धंगेकरांचे सर्व आरोप मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावले होते. 

पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बाबत काल विशाल गोखले बिल्डर यांनी संबंधित ट्रस्टींना आपण व्यवहार रद्द करत आहोत माझे पैसे परत द्या, असा मेल केला आहे. एका बाजूला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असून काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत असलेल्या रविंद्र धंगेकर यांना दोन दिवस काही न बोलण्याचे आदेश दिले असल्याचे स्वतः रविंद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. तसेच चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते, असा दावाही रविंद्र धंगेकरांनी केला. याचदरम्यान, मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol Meet Amit Shah) यांची मुंबईत भेट झाली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अमित शाह यांचे स्वागत केले.

अमित शाह यांचे मुंबईत काल रात्री आगमन- (Muralidhar Mohol Meet Amit Shah)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत काल रात्री आगमन झालं. केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांचे रात्री 1.30 वाजताच्या दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. केंद्रीय मंत्री शहा यांचे स्वागत सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमित शाहांच्या हस्ते अत्याधुनिक नौकांचे वितरण- (Amit Shah In Mumbai)

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज, मुंबईतील माझगाव डॉक येथे, 'खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचे वितरण होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते लाभार्थींना खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांच्या चाव्या सुपूर्द करणे, हा सहकार प्रणित, खोल समुद्रातील मासेमारी क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. हे पाऊल आत्मनिर्भरता, शाश्वतता आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सहकारी संस्थांना बळकट करण्याप्रति भारताच्या बांधिलकीचे प्रतीक असणार आहे.

संबंधित बातमी:

Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding: एकनाथ शिंदे जसं म्हणाले तसंच झालं, आता मी मुरलीधर मोहोळांसह सर्वांना जिलेबी भरवणार, रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: अमित शाहांनी चंद्रकांत पाटलांकडून मुरलीधर मोहोळांना संदेश पाठवला अन् चक्र फिरली, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द कसा झाला? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Operation Tiger : ठाकरेंचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात, आता हिंगोलीच्या खासदाराने घेतली एकनाथ शिंदेंची भेट
ठाकरेंचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात, आता हिंगोलीच्या खासदाराने घेतली एकनाथ शिंदेंची भेट
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
West Bengal : महिलांना 3000 रुपये महिना, बसचा प्रवास मोफत, सातवा वेतन आयोग गठीत; बंगालच्या कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय
महिलांना 3000 रुपये महिना, बसचा प्रवास मोफत, सातवा वेतन आयोग गठीत; बंगालच्या कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
Embed widget