एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding: एकनाथ शिंदे जसं म्हणाले तसंच झालं, आता मी मुरलीधर मोहोळांसह सर्वांना जिलेबी भरवणार, रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Jain Boarding पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट (Pune Jain Boarding) बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी ⁠जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding House Pune) जमिनीच्या व्यवहारावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मुरलीधर मोहळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे दिसून आले. मात्र रविंद्र धंगेकरांचे सर्व आरोप मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावले. दरम्यान, सदर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्यात देखील चर्चा झाली होती. याबाबत स्वत: रविंद्र धंगेकरांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली. 

दोन दिवसात जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलंय. तर पुढील दोन दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं 2 दिवसात तोडगा निघेल, त्यामुळे आनंदी असल्याचं रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुरलीधर मोहोळ यांना जो शब्द दिला, तोच खरा ठरल्याचं दिसून येतंय. दोन दिवसांच्या आधीच जैन बोर्डिंग ट्रस्ट (Pune Jain Boarding) बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या- विशाल गोखले (Pune Jain Boarding)

विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी ⁠जैन बोर्डिंग जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला आहे. जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना गोखलेंनी व्यवहार रद्द झाल्याचा ई-मेल केलाय. व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केलीय. धर्मदाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे मेलमध्ये नमूद केलंय, तर नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय. जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असंही गोखले म्हणाले. 

जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचा नेमका वाद काय? (What exactly is the dispute over the location of the Pune Jain boarding hostel?)

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

संबंधित बातमी:

Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: अमित शाहांनी चंद्रकांत पाटलांकडून मुरलीधर मोहोळांना संदेश पाठवला अन् चक्र फिरली, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द कसा झाला? वाचा ईनसाईड स्टोरी

Pune Jain Boarding: महायुती असतानाही नडले, शेवटी बिल्डरनेच जैन बोर्डिंगच्या जागेचा नाद सोडला; रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget