Priyanka Chaturvedi on Shrikant Shinde : मेरा बाप गद्दार हे... शिंदे गटावर टीका करताना प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली
North East Mumbai Lok Sabha Election 2024 : उत्तर पूर्व-मुंबईतून महाविकास आघाडीकडून संजय दिना पाटलांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्याच्याच प्रचारासाठी घाटकोपरमध्ये महाविकास आघाडीतर्फे प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
![Priyanka Chaturvedi on Shrikant Shinde : मेरा बाप गद्दार हे... शिंदे गटावर टीका करताना प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली Priyanka Chaturvedi targets to cm eknath shinde says mera baap gaddar hai it was written on Shrikant Shinde forehead North East Mumbai lok sabha election sanjay dina patil rally Priyanka Chaturvedi on Shrikant Shinde : मेरा बाप गद्दार हे... शिंदे गटावर टीका करताना प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/4fe5fe4f6091620464ece7a7195299611693660278871490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Priyanka Chaturvedi on Shrikant Shinde : घाटकोपर : घाटकोपर (Ghatkopar) येथे महाविकास आघाडीतर्फे (Maha Vikas Aghadi) संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या निवडणूक प्रचाराची सभा पार पडली. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि नितीन बानगुडे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या सभेत बोलताना प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रियंका चतुर्वेदींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
उत्तर पूर्व-मुंबईतून महाविकास आघाडीकडून संजय दिना पाटलांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्याच्याच प्रचारासाठी घाटकोपरमध्ये महाविकास आघाडीतर्फे प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते. या सभेत बोलताना प्रियांका चतुर्वेदींनी महायुतीवर जोरदार टीका केली. पण टीका करताना प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली. प्रियांका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलं.
मेरा बाप गद्दार है... हे श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय : प्रियांका चतुर्वेदी
प्रियांका चतुर्वेदींनी सभेत बोलताना बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या दीवार चित्रपटाचा दाखला दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर 'मेरा बाप गद्दार है' असं लिहिलंय, असं वक्तव्य प्रियांका चतुर्वेदींनी केलं. तसेच, याच सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र डागलं आहे. मोदींनी तेलंगणातील सभेत बोलताना काँग्रेसवर हल्ला चढवला होता. राहुल गांधींना अदानी-अंबानींकडून टेम्पो भरुन पैसे आलेत, त्यामुळे त्यांनी आता त्यांचं नाव घेणं बंद केलंय असं मोदी म्हणाले. मोदींच्या याच वक्तव्याला प्रियांका चतुर्वेदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा अशा प्रकारचा आरोप करतात, तेव्हा त्यांना माहिती आहे की, काळा पैसा कसा घ्यायचा... अशाच प्रकारे टेम्पोमधून काळा पैसा घेतला आहे. जर अदानी आणि अंबानी यांनी काळा पैसा दिला असेल, तर मग त्यांच्यावर ईडीची धाड का नाही पडली? असा सवालही पंतप्रधान मोदींनी भर सभेत विचारला.
नेमकं काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी?
"गद्दार गद्दारही रहेगा... एक चित्रपट आलेला, तुम्हालाही आठवत असेल दीवार. यात अमिताभ बच्चन त्यांचा हात दाखवतात, त्या हातावर लिहिलेलं असतं 'मेरा बाप चोर है'. पण यांच्या कपाळावर लिहिलंय, 'मेरा बाप गद्दार है'. मी आता यावर जास्त काही बोलणार नाही.", असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)