Congress Election: पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली गुलाम नबी आझाद यांची भेट, नाराज नेते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?
Congress G-23 Meeting: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी गुलाम नबी आझाद यांच्या घरी जी-23 नेत्यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Congress G-23 Meeting: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी गुलाम नबी आझाद यांच्या घरी जी-23 नेत्यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या वतीने पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी मंगळवारी गुलाम नबी आझाद यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे इतर नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधत असतानाच त्यांचे जुने सहकारी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे.
या भेटीबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी न्यूजला (ऑफ कॅमेरा) सांगितले की, त्यांचा राजीनामा दुर्दैवी आहे, यावर चर्चा झाली. पक्षाध्यक्ष निवडीबाबत चव्हाण म्हणाले की, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याचा आनंद आहे. याबाबतची रणनीती जाहीर न करता, आता वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री 73 वर्षीय आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस सोडली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामा पत्रात गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. लवकरच जम्मू-काश्मीरमधून पक्ष सुरू करणार असल्याचं आझाद यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Congress leaders Prithviraj Chavan, Anand Sharma and Bhupinder Hooda met former veteran Congress leader Ghulam Nabi Azad at his residence in Delhi pic.twitter.com/vcjD1JmBA2
— ANI (@ANI) August 30, 2022
7 ऑक्टोबरला होणार अध्यक्षपदाची निवडणूक
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, लोक विचार करायला स्वतंत्र आहेत. निवडणूक ही पक्षासाठी चांगली आहे, असे मी लेखात लिहिले आहे. आपल्या लोकशाही देशात पक्षांमध्ये देखील लोकशाही असली पाहिजे. काँग्रेस पक्षाने निवडणुका जाहीर केल्या, याचे मी स्वागत करतो.
इतर महत्वाच्या बातम्या:
Congress President Election: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार का? याबाबत काय म्हणाले ते जाणून घ्या
देशात दर तासाला 5 जणांच्या आत्महत्या, तर पंतप्रधानांच्या मित्राच्या संपत्तीत तासाला 85 कोटींची भर; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा