(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankja Munde and Devendra Fadanvis : दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशात पंकजा मुंडे अन् देवेंद्र फडणवीस डिनरसाठी एकाच टेबलवर!
Pankja Munde and Devendra Fadanvis : दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) एकाच टेबलवर जेवायला बसलेले पाहायला मिळाले. भाजपने राज्यसभेच्या 3 उमेदवारांमध्ये पंकजा मुंडेना स्थान दिले नव्हते.
Pankja Munde and Devendra Fadanvis : दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) एकाच टेबलवर जेवायला बसलेले पाहायला मिळाले. भाजपने राज्यसभेच्या 3 उमेदवारांमध्ये पंकजा मुंडेना स्थान दिले नव्हते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे पंकजा मुंडे(Pankja Munde) यांना डावलत आहेत, अशी टीका झाली होती. मात्र, आता दिल्लीच्या (Delhi) भाजपच्या (BJP) अधिवेशनात दोघे एकत्र भोजन करताना पाहायला मिळाले आहेत.
महायुतीकडून राज्यसभेवर कोणाला संधी मिळाली?
भाजपने नुकताच काँग्रेस सोडून नुकतेच पक्षात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले. तर चंद्रकांत पाटलांसाठी विधानसभा निवडणूक लढवू न शकलेल्या मेधा कुलकर्णींची राज्यसभेच्या माध्यमातून राजकीय सोय करण्यात आली. तर राम मंदिराच्या लढ्यात सहभागी असलेल्या डॉ. अजित गोपछडे यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आले.
निष्ठावत्यांना डावलण्याने भाजपवर टीका
नुकतेच काँग्रेसमधून आलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. मात्र, पंकजा मुंडेंना डाववले, असे म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की, "ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस फिरायचे, त्यांच्या लेकीला (Pankaja Munde) राज्यसभा का नाही? असा सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. याशिवाय शिंदे गटाकडूनही नुकतेच काँग्रेसमधून आलेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली.
Unity in Diversity!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 17, 2024
Chai pe Charcha with BJP State Leaders & colleagues from various States of India 🇮🇳 during the #BJPNationalCouncil2024.@BJP4India @kpmaurya1 @SarojPandeyBJP @vishnudsai @samrat4bjp @cbawankule#Maharashtra #NewDelhi #BJPNationalCouncil2024 #BJP #NarendraModi… pic.twitter.com/RWb17zq8ch
माधव भंडारी यांच्या मुलाकडूनही नाराजी
राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने भाजप नेते माधव भंडारी यांच्या मुलानेही नाराजी व्यक्त केली होती. माधव भंडारी यांच्या मुलाने ट्वीटरवर पोस्ट करत नाराजी व्यक्ती केली. चिन्मय भंडारी म्हणाले, " पक्षासाठी, जनतेसाठी काम करत असताना माझे वडिल नेहमीच प्रसिद्धीच्या वलयापासून लांब राहिले. त्यांनी कधीच त्यांच्या पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केला नाही. पण दुर्दैवाने त्यांना कायमच केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं"
इतर महत्वाच्या बातम्या